छोट्या पडद्यावरची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. राखीचा पती आदिल खान दुर्रानी कोठडीत आहे. काही दिवसांपूर्वी एकमेकांविरोधात बोलणाऱ्या राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा मैत्रिणी झाल्यात. शर्लिन चोप्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून आदिल दुर्रानीला पाठिंबा दिला होता आणि राखी सावंतला फटकारले होते, मात्र आता तिने युटर्न घेतला आहे. आता शर्लिन चोप्रा राखी सावंतसोबत दिसली आहे.
फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केलेल्या त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील व्हिडीओवर राखी सावंत आणि शार्लिन चोप्रा एकत्र दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये शर्लिन चोप्रा राखी सावंतला म्हणते, 'राखी, तुला तुझ्या आयुष्यातील राजकुमार सापडला आहे, मग तू आनंदी का नाही? तुझ्या आयुष्यात एंट्री केलेल्या राजकुमार ठग असल्याचं कळतंय. जो लोकांना मूर्ख बनवतो, लोकांना फसवतो.
राखी सावंत आणि शर्लिन चोप्राचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक जोरदार कमेंट करतायेत. दोघींना एकत्र पाहून लोकही हैराण झालेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, 'लो कर लो बात, सौतन बनी सहेली.' दुसऱ्याने लिहिले, 'दोघी सारख्याच आहेत.' तर काहींनी लिहिले, 'हे सर्व काय चालले आहे.' याशिवाय इतर अनेक सोशल मीडिया यूजर्सनीही कमेंट केल्या आहेत. राखी सावंतचा पती आदिल दुर्रानी याच्यावर मैसूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एका इराणी विद्यार्थिनीने वीवी पुरम पोलीस ठाण्यात कलम ३७६, ४१७, ४२०, ५०४ आणि ५०६ नुसार बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. इराणी विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, आदिल खानने तिला लग्नाचे वचन देत मैसूरमधील एका अपार्टमेंटमध्ये तिच्यावर बलात्कार केला. या अपार्टमेंटमध्ये दोघंही एकत्र राहत होते. पाच महिन्यांपूर्वी जेव्हा या विद्यार्थिनीने आदिलला लग्नाची गळ घातली तेव्हा त्याने असे करण्यास नकार दिला आणि त्याने आपले तिच्यासारख्या अनेक तरुणींशी असे संबंध असल्याचे सांगितले.