Rakhi Sawant : ड्रामा क्वीन राखी सावंतने पती आदिल दुर्रानीवर एकापेक्षा एक अनेक गंभीर आरोप केले आहेत. राखीचे रोज नवीन नवीन व्हिडिओ समोर येत आहेत ज्यामध्ये ती नवनवीन खुलासे करत आहे. मारहाण, फसवणुक केल्याप्रकरणी राखीचा पती आदिल तुरुंगात आहे. त्याला जामीन मिळू नये म्हणून राखी पुरेपूर प्रयत्न करत आहे. आयुष्यात आदिलशी लग्न करुन चूक केली असं म्हणत ती स्वत:लाच थपडा मारत आहे. इतकंच नाही तर मी सुद्धा फ्रीजमध्ये गेले असते आदिलने पूर्ण प्लॅन केला होता असंही ती म्हणाली. राखीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राखीने आदिलशी कोर्ट मॅरेज करत इस्लाम धर्म स्वीकारला. तिने नावही 'फातिमा'असेही केले. मात्र आदिलने तिचा विश्वासघात केला आहे. राखीचा हा ड्रामा आहे ती हे प्रसिद्धीसाठी करत आहे असं म्हणत ती चांगलीच ट्रोल होत आहे. नुकत्याच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये राखी म्हणते,'माझ्यासोबतही भयानक घटना होणार होती. मी सुद्धा फ्रीजमध्ये जाणार होते, नदीत जाणार होते, पंख्याला लटकणार होते. तुम्ही मेसेज बघितले आहेत आदिलने पूर्ण प्लॅन केला होता. डिसेंबर नोव्हेंबर पर्यंत तो मला सोडणार होता आणि दुसरीशी लग्न करणार होता. मात्र तेवढ्यात मी मराठी बिग बॉसमध्ये गेले.'
राखीच्या या व्हिडिओत ती सुरुवातीला स्वत:ला जोरजोरात थपडा मारतानाही दिसते. 'मी सगळ्या गोष्टींचं पालन करते, नमाज पठण करते, धर्म बदलला पण आता मला स्वत:लाच मारण्याची इच्छा होते. मी का प्रेम केले आता मी कुठे जाऊ', असं राखी व्हिडिओत म्हणत आहे.