सलमान खानचा (Salman Khan) वादग्रस्त शो बिग बॉस 15 (Bigg Boss 15) आता अंतिम फेरीकडे वाटचाल करत आहे. शो हिट करण्यासाठी आणि टीआरपी वाढवण्यासाठी निर्माते अजूनही नवीन युक्त्या वापरत आहेत. रिपोर्ट्सनुसार, शोच्या विजेत्याचे नाव 16 जानेवारीला समोर येईल. दरम्यान, या शोशी संबंधित एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या एपिसोडमध्ये राखी सावंत (Rakhi Sawant) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) या दोन्ही स्पर्धकांनी असे काही धक्कादायक खुलासे केले होते की, शोवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. या दोघांच्या बोलण्यावरून हा शो पूर्णपणे स्क्रिप्टेड असल्याचं स्पष्ट होतं. राखी करण कुंद्राला सांगते की तेजस्वी प्रकाश जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, ज प्रामाणिक आहेत आणि चांगले असतील त्याला संधी देऊ.
राखी सावंत म्हणाली मी उगाच सगळं काही स्वतःला वाटेल ते बोलत नाही. गेल्या सिझनमध्येही मी हेच सांगत होती की, रुबिना दिलैक जिंकेल आणि तेच घडले. तेजस्वी जर फिनालेमध्ये आली नाही तर करणला जिंकण्याची सर्वाधिक संधी आहे, असेही ती म्हणाली. त्याचवेळी तेजस्वीने अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या ऐकल्यानंतर शोच्या फॉरमॅटवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. राखी आणि तेजस्वीच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे, हे येणारा काळच सांगेल, मात्र या वीकेंड का वारमध्ये सलमान खान या दोघांचे क्लास घेऊन सत्यता प्रेक्षकांसमोर ठेवणार असल्याचे मानले जात आहे.
शेवटच्या एपिसोडमध्ये बिग बॉसने व्हीआयपी झोनमध्ये पोहोचण्यासाठी नॉन व्हीआयपी सदस्यांपैकी एकाला टास्क दिला होता, ज्यामध्ये तेजस्वी प्रकाशच्या घाणेरड्या सवयींबद्दल प्रेक्षकांना समजले. वास्तविक, टास्कमध्ये व्हीआयपी झोनमध्ये पोहोचलेल्या चार सदस्यांना (राखी सावंत, रश्मी देसाई, उमर रियाझ आणि करण कुंद्रा) जज बनवण्यात आले होते.
याशिवाय उर्वरित सदस्यांना प्रत्येक मुद्यावर चर्चेचे करण्याचा टास्क देण्यात आला होता. बिग बॉसने देवोलीनाला बाथरूममधील अस्वच्छतेबाबत आणखी एका सदस्याला आरोपी बनवण्यास सांगितले.देवोलीनाने तेजस्वीला आरोपी बनवले. देवोलीनाचा आरोप आहे की, तेजस्वी बाथरूम व्यवस्थित साफ करत नाही. यानंतर देवोलिना म्हणाली की, तेजस्वी ब्रश करत नाही. कधी कधी ती दिवसभर ब्रश करत नाही. ती आंघोळही करत नाही. ती स्वच्छतेची काळजी घेत नाही.