Join us

'राखी का स्वयंवर'मध्ये केले होते इलिशने ऑनस्क्रीन लग्न, जाणून घ्या सध्या तो काय करतोय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 15:13 IST

 मोठ्या मेहनतीने राखीने आज इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. यशाचं हे शिखरं अजुन आभाळा पर्यंत पोहचु शकलं असतं......मात्र त्याचवेळी राखीने केलं स्वयंवर....

आयटम गर्ल राखी सावंत जीच्या प्रत्येक झलक वर सारेच व्हायचे फिदा. जीच्या एका हाकेवर मधमाशांप्रमाणेच मिडीया देखील व्हायची जमा आणि आता याच आयटम गर्लचा पारा झालाय थंड. सध्या बिग बॉस १४ मध्ये राखी सावंत धुमाकुळ घालत आहे.

तिच्या ना- ना हरकती सा-यांच्याच पसंतीस उतरत आहे. मात्र ख-या आयुष्यात राखी सावंतची जादू हळूहळू कमी होत चाललीय...जसंजसं वय वाढत जातंय तस तसं राखी तिच्या अदाकारीत फिकीही पडताना दिसते.

 मोठ्या मेहनतीने राखीने आज इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. यशाचं हे शिखरं अजुन आभाळा पर्यंत पोहचु शकलं असतं......मात्र त्याचवेळी राखीने केलं स्वयंवर.....मात्र तिनं दिलेली प्रेमाची वचनं तोडल्या नंतर तिच्या यशाचा ग्राफ जणू घसरू लागला.

राखी का स्वयंवर या रिएलिटी शोमध्ये राखीचे लग्न कॅनाडामध्ये राहणार-या एलिशबरोबर झाल्याचे दाखवण्यात आले होते. ऑनस्क्रीन रंगलेला हा विवाह सोहळा अनेकांना खरोखरचा लग्न सोहळा वाटला होता. आता राखी एलिश बरोबर कॅनाडात स्थायिक होणार आणि संसारात रमणार असे तर्क वितर्क लावले गेले. मात्र राखीने असे न करता तो विश्वासू नसल्याचे सांगत लग्न मोडले. 

मात्र राखी आणि एलिशचा ऑनस्क्रिन झालेला विवाह सोहळा हा केवळ टीआरपीसाठी रचलेला खेळ होता.राखी प्रसिध्दीच्या झोतात राहु शकेल.. आज एलिश कॅनडामध्ये यशस्वी व्यावसायिक आहे. त्याचे लग्नही झाले आहे. त्याल एक मुलगाही आहे. आज एलिश कॅनडामध्ये आलिशान आयुष्य जगत आहे. 

 ऑन स्क्रीन ड्रामा करत राखीला चांगल्या ऑफर्स मिळतील असे वाटले असावे,अखेर इतके प्रयत्न करूनही राखीबाबत  'बात कुछ बनी नही'  असंच म्हणावं लागेल....बॉलिवूडमधील निर्मात्यांची दारं राखी सावंतसाठी बंद झालेली नाहीयेत....पण तरीही तिच्या कोणत्याच सिनेमाची घोषणा देखील ब-याच दिवसांपासून झालेली ही नाहीये...राखी सावंतकडे आता दाखवण्यासाठी उरलंय ते फक्त आणि फक्त भोजपुरी सिनेमे, रिएलिटी शो या पलिकडे आगामी काळात राखी काय धमाका करते हे पाहणे रंजक ठरणार आहे. 

 

टॅग्स :राखी सावंतबिग बॉस १४