राखी सावंतच्या ‘नकली पती’ची मेट्रोत धुलाई, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 11:00 AM2019-11-14T11:00:35+5:302019-11-14T11:02:30+5:30

राखी सावंतचा ‘नकली पती’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होतोय.

Rakhi Sawant's 'Fake Husband' deepak kalal slapped by woman in delhi metro | राखी सावंतच्या ‘नकली पती’ची मेट्रोत धुलाई, व्हिडीओ व्हायरल

राखी सावंतच्या ‘नकली पती’ची मेट्रोत धुलाई, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देदीपक कलाल एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. गोव्यात त्याचे एक हॉटेलही आहे.

सोशल मीडियावर दीपक कलाल आपल्या ‘ऊटपटांग’ व्हिडिओसाठी ओळखला जातो. दीपक रोज नवे चित्रविचित्र व्हिडिओ शेअर करतो आणि लोकांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतो. गतवर्षी दीपक कलाल ‘ड्रामा क्विन’ राखी सावंतसोबतच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत होता. पण हे लग्नही निव्वळ एक ड्रामा होता. आता राखी सावंतचा हा ‘बनता बनता  राहिलेला नवरा’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होतोय. होय, या व्हिडिओत एक मुलगी दीपकच्या कानशीलात लगावताना दिसतेय. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ खुद्द दीपक कलालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.


या व्हिडीओत दीपक दिल्लीत मेट्रोत प्रवास करताना दिसतोय. दिल्लीत मेट्रोतून प्रवास करत असताना एका मुलीने त्याला ओळखले आणि तिने त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. पण दीपकने तिला विरोध केला. न विचारता तू सेल्फी घेऊच कशी शकतेस? मी सेलिब्रिटी आहेस, सेल्फी घेण्याआधी तुला माझी परवानगी घेणे गरजेचे आहे, असा कांगावा करत, दीपक ओरडू लागला. सुरुवातीला लोकांना हा नेहमीप्रमाणे दीपकचा पब्लिसिटी स्टंट वाटला. पण दीपक थांबेना मग काय, त्या मुलीने दीपकच्या जोरदार कानशीलात लगावली. याऊपरही दीपक बधेना. त्याचा तो ड्रामा पाहून प्रवासी संतापले आणि त्यांनी दीपकची कॉलर पकडून त्याला दूर खेचले. सध्या हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय.


सोशल मीडियावरच्या त्याच्या प्रोफाईलनुसार, दीपक कलाल एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. गोव्यात त्याचे एक हॉटेलही आहे. २०११ मध्ये काश्मिरातून त्याचा पहिला व्हिडिओ आला. यानंतर त्याचे अनेक अ‍ॅडल्ट व्हिडिओही आलेत. या व्हिडिओसाठी तो प्रचंड ट्रोलही होतो.

 

Web Title: Rakhi Sawant's 'Fake Husband' deepak kalal slapped by woman in delhi metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.