सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो. राम कपूरने 'बडे अच्छे लगते है' या मालिकेतून खूप नाव मिळवलं.आता राम कपूर पुन्हा छोट्या पडद्याकडे वळला आहे.
राम कपूर सत्य घटनेवर आधारित 'जिंदगी के क्रॉसरोड' हा शो होस्ट करत आहे. खरं तर हा शो होस्ट करण्यासाठी राम कपूर सुरुवातीला तयार नव्हता.साचेबद्ध काम करण्यात रस नसून वेगळे काहीतरी करण्याच्या प्रयत्नात राम कपूर होता.त्यामुळे सिनेमा आणि वेब सीरिजवरच लक्ष केंद्रित करण्याची इच्छा होती. राम कपूरला या शोसाठी तगडी रक्कम ऑफर करण्यात आली आणि अपना सपना मनी मनी म्हणत त्याने ही ऑफर स्विकारली.
कारण या शोसाठी एक एपिसोड होस्ट करण्यासाठी राम कपूरला दहा ते बारा लाख रुपये दिले जातात. त्यानुसार 39 एपिसोड्ससाठी त्याला एकूण चार कोटी मिळत आहेत. त्यामुळे राम कपूरची जादू आजही कायम असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. इतक्या वर्षानंतरही रसिकांचे राम कपूरवरील प्रेम तसंच कायम असल्याचा विश्वास निर्मात्यांना आहे. सध्या छोट्या पडद्यावर 'इंडियन आयडॉल', 'जज्बात - संगीन से नमकीन तक', 'जिंदगी के क्रॉसरोड', 'सबसे स्मार्ट कौन' आणि 'दिल है हिंदुस्तानी 2' हे रिअॅलिटी शोज सुरु आहेत.
राम कपूरला आपण 'घर एक मंदिर', 'कसम से', 'बडे अच्छे लगते है' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये पाहिले आहे.अनेक चित्रपटातही तो महत्त्वाच्या भूमिका साकारतो.'घर एक मंदिर' या मालिकेतील रामच्या कामाचे कौतुक झाले असले तरी त्या मालिकेमुळे त्याला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. पण 'कसम से' मालिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. 'बडे अच्छे लगते है' या मालिकेने त्याचे संपूर्ण करियर बदलले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. आज राम हा छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता आहे.