कोरोना व्हायरसमुळे सध्या देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सिनेसृष्टीही बंद असल्यामुळे शूटिंग होत नाही. यामुळे टेलिव्हिजनवर दाखवण्यासाठी डेली एपिसोड नसल्यामुळे जुन्या एव्हरग्रीन मालिका पुन्हा प्रसारीत केल्या जात आहेत. त्यातील लोकप्रिय मालिका म्हणजे रामायण. ऐंशीच्या दशकात ज्यावेळी रामानंद सागर यांची रामायण ही मालिका सुरू झाली होती तेव्हा लोक हातातील सगळी कामे बाजूला ठेवून शेजारांच्या टीव्हीवर मालिका पाहण्यासाठी जात होते. सकाळी 9 वाजता सर्व गल्ली सामसूम होत होत्या. पाहिलं तर आज लॉकडाउनमुळे सगळीकडे सामसूम झालं आहे. रामायणमधील लव कुश हे पात्रदेखील लोकप्रिय झाले होते.
रामायणातील उर्वरित पात्रांप्रमाणेच या कार्यक्रमात लव-कुशची भूमिका साकारणारी तत्कालीन बाल कलाकारही मोठी झाली आहेत. ही भूमिका दोन मराठी मुलांनी केली होती.
यापूर्वी त्याने याच क्षेत्रातील काही नामांकित कंपन्यांसाठी व्यवस्थापकीय संचालकपद भूषवले आहे. तो एक अद्भुत लेखक देखील आहे आणि “स्पाय अँड डेव्हलपमेंट” हे पुस्तक त्यांनी इतर दोन परदेशी लेखकांसोबत मिळून लिहिले आहे.