Join us

रामभक्तांसाठी आनंदाची बातमी! रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका पुन्हा एकदा TV वर; कधी आणि कुठे पाहता येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 11:52 AM

आता पुन्हा एकदा रामायण टीव्हीवर दाखवण्यात येणार आहे.

अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा  २२ जानेवारीला पार पडला. ऐतिहासिक सोहळ्याने संपूर्ण देशात राममय वातावरण निर्माण झालं आहे.  अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर प्रभू राम आल्याने देशभरातील सर्व स्तरातील लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आता यातच रामभक्तांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.आता रामानंद सागर यांची  'रामायण' मालिकापुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रामायण' ही मालिका कधी आणि कुठे पाहता येणार याबाबत जाणून घेऊयात...

'रामायण' या मालिकेला प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळालेली आहे. भारताच्या टीव्ही इतिहासातली सगळ्यात यशस्वी मालिका म्हणून ‘रामायण’ कडे पाहिलं जातं. या मालिकेत अरुण गोविल (श्रीराम), दीपिका चिखलिया (सीता), दारा सिंग (हनुमान), सुनील लाहिरी (लक्ष्मण) आणि अरविंद त्रिवेदी (रावण) यांच्या या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत. आता पुन्हा एकदा रामायण टीव्हीवर दाखवण्यात येणार आहे. 'रामायण' ही मालिका डीडी नॅशनलवर प्रसारित होणार आहे. 

नुकतीच याबाबत दूरदर्शन नॅशनल (डीडी नॅशनल) यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. दूरदर्शनने एक फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,  "मंगल भवन अमंगल हारी। द्रवहु सुदसरथ अजिर बिहारी॥ पुन्हा एकदा धर्म, प्रेम आणि दानाची अलौकिक पौराणिक कथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. संपूर्ण भारतातील सर्वात लोकप्रिय शो 'रामायण' डीडी नॅशनलवर पाहा".  रामायण या मालिकेची वेळ आणि तारिख यांची माहिती अजून दूरदर्शनने दिलेली नाही.

'रामायण'चं 1987-88 मध्ये पहिल्यांदा प्रसारण झालं. तेव्हाही या मालिकेने प्रेक्षकांना टीव्हीसमोर खिळवून ठेवलं होतं. रामायण प्रसारित व्हायचं तेव्हा  लोक एकत्र येऊन टीव्हीवर ही मालिका पाहायचे. ही मालिका संपल्याला वर्षं उलटून गेली तरी लोकांच्या जीवनावरचा तिचा प्रभाव ओसरलेला नाही. आजही मालिकेची तेवढीच क्रेझ आहे. लॉकडाऊनच्या काळात पुनर्प्रसारणादरम्यान या मालिकेचं प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान असल्याचं सिद्ध झालं. आता पुन्हा  ही मालिका पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

टॅग्स :रामायणसेलिब्रिटीटेलिव्हिजन