सोनी सबवरील मालिका 'तेनाली रामा'मध्ये नवीन पात्राच्या एन्ट्रीसोबत प्रेक्षकांना मोठा बदल पाहायला मिळणार आहे. कृष्णदेवरायची (मानव गोहिल) बहीण तिच्या भाचीला विवाहासाठी घेऊन येते. पण ती रामाच्या (कृष्ण भारद्वाज) प्रेमात पडते आणि तेथूनच गोंधळाला सुरूवात होते.
सुगंधा देवीच्या (ऐश्वर्या राज भकुनी) प्रवेशासह रामाच्या जीवनात अनेक संकटे येतात. खरेतर तिचा विवाह कृष्ण देवरायशी होणार असतो, पण सुगंधा रामाकडे आकर्षून जाते आणि त्याच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवते. या स्थितीचा फायदा घेत तथाचार्य (पंकज बेरी) रामा व शारदा यांच्यामध्ये समस्या निर्माण करण्यासाठी दुष्ट खेळी खेळतो. रामाच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेण्यासाठी शारदा पैशासाठी रामाला सुगंधाकडे विकते. हे पाहून सर्वजण अचंबित होतात. पण कथेला नवे वळण मिळते. शारदाच्या या कृत्यामुळे दुखावलेला रामा स्वत:ला व मुलगा भास्करला विजयनगरमधील दुसऱ्या महिलांना विकण्याचे ठरवतो.रामा व सुगंधा विवाह करण्यास सज्ज असताना कोणते नाटक घडते, हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुगंधाच्या भूमिकेत मालिकेमधील प्रवेशाबाबत बोलताना ऐश्वर्या राज भकुनी म्हणाली, 'मी सुगंधा देवीच्या भूमिकेसाठी आणि तेनाली रामा मालिकेतील या नवीन बदलासाठी खूपच उत्सुक आहे. तेनाली रामाच्या सर्व कलाकारांसोबत काम करण्याचा मनसोक्तपणे आनंद मी घेत आहे. ते अत्यंत प्रतिभावान आहेत आणि सहाय्यक देखील आहेत. सुगंधा प्रत्येकाच्या जीवनात नवे वळण आणण्यासाठी आली आहे. मला खात्री आहे की, प्रेक्षक त्यांच्यासाठी आगामी एपिसोड्समध्ये असलेल्या मनोरंजनाचा आनंद घेतील. 'रामाच्या भूमिका साकारणारा कृष्ण भारद्वाज म्हणाला, 'रामाला त्याच्या जीवनात खूप मोठा धक्का बसतो. सुगंधा देवीची त्याच्यासोबत विवाह करण्याची इच्छा आहे. तो या परिस्थितीतून कशाप्रकारे बाहेर पडतो हे पाहणे प्रेक्षकांसाठी रोमांचक ठरणार आहे. प्रेक्षकांनी नेहमीच मालिकेवर भरपूर प्रेम केले आहे. मी आशा करतो की, त्यांचे हे प्रेम कायम राहील.'