Join us

 एक नंबर...! ‘रामायण’, ‘महाभारत’मुळे पुन्हा एकदा 'दूरदर्शन'चे युग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 2:50 PM

पालटले दूरदर्शनचे दिवस

ठळक मुद्देरामायणने मोडले टीआरपीचे विक्रम

कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या काळात प्रेक्षकांची मागणी लक्षात घेता दूरदर्शनने  रामायण व  महाभारत  सारख्या  पौराणिक मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनच्या काळात खास लोकांच्या मनोरंजनासाठी हा निर्णय घेण्यात आला. केवळ रामायण, महाभारतच नाही तर 90 च्या दशकातील अनेक लोकप्रिय मालिका दूरदर्शनवर परतल्या. आता त्याचे परिणाम समोर आहे. होय, या सुपरहिट व लोकप्रिय मालिकांच्या बळावर दूरदर्शन वाहिनी आता क्रमांक एकवर पोहोचली आहे. होय, सर्वाधिक पाहिल्या जाणा-या वाहिन्यांमध्ये सर्वात अव्वल क्रमांकावर दूरदर्शन आहे.सध्या दूरदर्शन लोकांचे लोकप्रिय चॅनल बनले आहे. याचे कारण आहे रामायण, महाभारत, देख भाई देख, बुनियाद, शक्तिमान यासारखे एकेकाळी प्रचंड गाजलेले शो. या मालिकांचीच जादू म्हणायची की, इतक्या वर्षांनंतर दूरदर्शनचे सुवर्णयुग परतले आहे.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही आठवड्यात दूरदर्शनच्या प्रेक्षकांच्या संख्येत प्रतिदिन 40 हजारांची वाढ झाली आहे. 13 आठवड्यात दूरदर्शन सर्वाधिक पाहिले गेले. 12 व्या आठवड्यात दूरदर्शनला 267 मिलियन व्युवरशिप मिळाले. 13 व्या आठवड्यात हा आकडा 2109 मिलियनवर पोहोचला. म्हणजेच दूरदर्शनच्या प्रेक्षकांच्या संख्येत 650 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.

रामायणने मोडले टीआरपीचे विक्रम

टीआरपीच्या चार्टमध्ये रामायण या धार्मिक मालिकेने इतर सर्व मनोरंजन वाहिन्यांना पछाडत, टीआरपीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. दूरदर्शनवर प्रसारित रामायण हा शो 2015 पासून आत्तापर्यंतचा सर्वाधिक टीआरपी मिळवणारा हिंदी जनरल एंटरटेनमेंट शो ठरला आहे.

टॅग्स :रामायणमहाभारत