Join us

'तुला खऱ्या आयुष्यातही रावणानेच पळवलं'; रिअल लाइफ नवऱ्यामुळे 'रामायण'ची सीता झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 12:23 IST

Dipika chikhlia:  दीपिका यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका चिखलिया (Dipika chikhlia) सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असतात. रामायणमध्ये (ramayan) सीता ही भूमिका साकारुन त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यामुळे वरचेवर नेटकऱ्यांमध्ये त्यांची चर्चा रंगते. अलिकडेच दीपिका यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी त्यांच्या नवऱ्यासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला. मात्र, नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे.

 दीपिका यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यात त्यांनी त्यांच्या पतीसोबतचे काही फोटो कोलाज करुन त्याचा छान व्हिडीओ तयार केला आहे. यात त्यांच्या काही रोमॅण्टिक फोटोंचाही समावेश आहे. परंतु, हे फोटो पाहिल्यावर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

काय म्हणाले नेटकरी?

तुम्ही माझ्या आयुष्यात आहात यातच मी खूप आनंदी आहे. तुम्ही माझ्या आयुष्यातलं पर्वत आहात. तुमच्यामुळे मी धन्य झाले, असं कॅप्शन दीपिका यांनी दिलं होतं. परंतु, काही जणांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तर, काहींनी मात्र ट्रोल केलं.

काय म्हणाले ट्रोलर्स?

'सीता मैया तुम्ही असे व्हिडीओ नका टाकत जाऊ', असं एका युजरने म्हटलं आहे. तर,  'या तर चुकीच्या पोझ देऊन फोटो काढलेत', असं अन्य एकाने म्हटलं आहे. तर,  'मातेला हात लावू नका', अशी कमेंट एका युजरने दीपिका यांच्या पतीला उद्देशून केली आहे. इतकंच नाही तर, 'तुम्ही असे फोटो काढू नका सगळा देश तुम्हाला देवाच्या स्थानी मानतो', 'आज मला कळलं की खऱ्या आयुष्यातही सीतेला रावणानेच पळवलं होतं'.

दरम्यान, दीपिका चिखलिया यांनी १९८७ मध्ये रामानंद सागर यांच्या रामायण या पौराणिक मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत सीतेची भूमिका साकारुन त्या घराघरात लोकप्रिय झाल्या. 

टॅग्स :टेलिव्हिजनरामायणसेलिब्रिटी