Join us

या वयात इमेज का खराब करताय?; ‘रामायण’ मालिकेतील ‘सीते’वर नेटकरी चिडले, थेटच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 11:41 AM

Ramayana Actress Dipika Chikhlia Trolled: अनेक जण आजही अरूण गोविल यांना ‘राम’ तर दीपिका चिखलिया हिला ‘सीता’ म्हणूनच ओळखतात. पण सध्या दीपिका चिखलिया...

Ramayana Actress Dipika Chikhlia Trolled: 80 च्या दशकात रामानंद सागर यांची ‘रामायण’ (Ramayana) ही मालिका तुफान लोकप्रिय झाली होती. मालिकेतील व्यक्तिरेखा आणि ती साकारणा-या कलाकारांना आजही प्रेक्षक विसरू शकले नाहीत. अरूण गोविल यांनी साकारलेला  राम आणि दीपिका चिखलियाने साकारलेली  सीता आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.अनेक जण आजही अरूण गोविल यांना ‘राम’ तर दीपिका चिखलिया  हिला ‘सीता’ म्हणूनच ओळखतात. सध्या दीपिका चिखलिया ट्रोल होतेय. होय, दीपिकाचा मॉडर्न अवतार पाहून चाहते भडकले आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.

नुकताच दीपिकाने सोशल मीडियावर एक डान्स व्हिडीओ शेअर केला होता. क्रिम कलरचा थरारा घालून ‘ओ मेरे शोना रे’ या गाण्यावर ती थिरकताना दिसतेय. दीपिकाने गाण्यावर ग्रेसफुल डान्स केलाय. पण हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरूवात केली. अनेकांनी तर दीपिकाला अनफॉलो करण्याची धमकीही दिली.लोकांच्या मनात आजही दीपिका चिखलियाची एक वेगळी इमेज आहे. त्यांना लोक आजही ‘सीता माता’ म्हणून ओळखतात. अशात लोकांना त्यांनी असं गाण्यावर थिरकणं, व्हिडीओ शेअर करणं अनेकांना आवडलं नाही.

‘हे माते! काहे अपनी सम्मानित छवि बदल रही है ढलती उम्र में,’ असं एका युजरने तिच्या व्हिडीओवर लिहिलं. कदाचित तुला सीता मातेच्या भूमिकेनं मिळालेला मानसन्मान पुरेसा नाही. अरूण गोविल यांच्याकडून काही शिक़, असं एका युजरने कमेंट करत लिहिलं. माताजी, तुला अनफॉलो करतोय. कारण मी तुम्हाला अशा अवतारात बघू शकत नाहीये, असं लिहित एका युजरने आपला संताप व्यक्त केला.

रामायण’या मालिकेनंतर दीपिकाने नंतर  विक्रम वेताळ, लव कुश  या मालिकांमध्येही काम केले. 1991 मध्ये ती राजकारणातही आली. ‘रामायण’मुळे मिळालेल्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत तिने 1991 मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकली. पण, काही वर्षांनी तिने राजकारणालाही रामराम ठोकला.

टॅग्स :रामायणटिव्ही कलाकार