Join us

रमेश देव यांची ‘छत्रीवाली’ मालिकेत एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 06:30 IST

सदानंद कुलकर्णी असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून बिझनेस जगतात त्यांची वेगळी ओळख आहे. सदानंद कुलकर्णी पुण्यात त्यांची नात नीलम हिच्यासोबत रहातात

ठळक मुद्देगायकवाड कुटुंबासोबत त्यांचे चांगले संबंध आहेतसदानंद यांची नात नीलम हिचं विक्रमशी लग्न व्हावं ही तिची अंतिम इच्छा होती

‘स्टार प्रवाह’च्या छत्रीवाली मालिकेत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांची एंट्री झालीय. सदानंद कुलकर्णी असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून बिझनेस जगतात त्यांची वेगळी ओळख आहे. सदानंद कुलकर्णी पुण्यात त्यांची नात नीलम हिच्यासोबत रहातात. गायकवाड कुटुंबासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. अरुंधती म्हणजे विक्रमच्या आईला ते मुलीप्रमाणे मानायचे. अरुंधतीचा नवरा म्हणून सूर्यकांत यांची सदानंदरावाशी ओळख झाली. सूर्यकांतसाठी सदानंद म्हणजे आदर्श ठरले आणि ते त्यांना बिझनेस गुरु मानु लागले. आजारपणात विक्रमची आई म्हणजेच अरुंधतीने जगाचा निरोप घेतला. सदानंद यांची नात नीलम हिचं विक्रमशी लग्न व्हावं ही तिची अंतिम इच्छा होती. अरुंधतीची हीच इच्छा पूर्ण व्हावी या हेतूने सदानंद यांची मालिकेत एंट्री झाली आहे.

 तसेच ‘छत्रीवाली’मध्ये मधुरा विक्रमची लव्हस्टोरी निर्णायक वळणावर येऊन पोहोचलीय. दोघांनीही आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिलीय. विक्रम आणि मधुराचं नातं निर्णायक वळणावर असतानाच आता सदानंद यांच्या एंट्रीने ही गुंतागुंत आणखी वाढणार आहे. एकीकडे मधुरावरचं प्रेम तर दुसरीकडे आईची अंतिम इच्छा हा गुंता विक्रम कसा सोडवणार? याची उत्कंठावर्धक कहाणी ‘छत्रीवाली’च्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. मधुराच्या आईला म्हणजेच होणाऱ्या सासुबाईंना विक्रम त्याच्या आणि मधुराच्या नात्यासाठी कसे तयार करणार? हे पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

टॅग्स :रमेश देवछत्रीवाली