राणादा आणि पाठकबाईंचा जीव 'ती'च्यात रंगला,जाणून घ्या कोण आहे 'ती'?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 7:08 AM
चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि सेलिब्रिटी मंडळींचे अनेक फॅन्स असतात. आपल्या लाडक्या कलाकारासाठी काहीही करण्याची या फॅन्सची तयारी असते. महानायक बिग ...
चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि सेलिब्रिटी मंडळींचे अनेक फॅन्स असतात. आपल्या लाडक्या कलाकारासाठी काहीही करण्याची या फॅन्सची तयारी असते. महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या भेटीला दर रविवारी मोठ्या संख्येने गर्दी करणारे फॅन्स असो किंवा शाहरुख-सलमान आणि आमिरचे फॅन्स असो. प्रत्येक फॅन्सची काही ना काही खासियत असते. कलाकारांसाठी वाट्टेल ते करण्याची या फॅन्सची तयारी असते. मग आपल्या लाडक्या कलाकारासारखी स्टाईल असो, हेअर स्टाईल असो किंवा मग त्याच्यासारखा लूक असो अशा कलाकार वेड्या फॅन्सची भारतात कमी नाही. काही फॅन्स तर आपल्या आवडत्या कलाकाराच्या नावाने पोस्टर बनवतात, सोशल मीडियावर ग्रुपही तयार करत असल्याचेही पाहायला मिळते. फॅन्सच्या ना-ना त-हा भारतात आढळतात. मात्र यांत वेगळी आणि लक्षवेधी ठरत आहे ती राणादा आणि पाठकबाईंची चिमुकली फॅन.एबीपी माझाच्या रिपोर्टनुसार,अवघ्या सव्वातीन वर्षीय या गोंडस फॅनचं नाव आहे मधुरा. छोट्या पडद्यावरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेनं अल्पावधीत रसिकांची मने जिंकली आहेत. त्यातील राणादा आणि पाठकबाई तर घराघरात प्रसिद्ध आहे. राणादा आणि अंजलीबाईंचे अनेक फॅन्स आहेत.मात्र यांत आगळीवेगळी आणि लक्षवेधी ठरली आहे ती कोल्हापूरच्या मातीतील मधुरा. कोल्हापुरातील गावात सध्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेचं शूटिंग सुरु आहे. शूटिंगच्या वेळी मधुराच्या घराबाहेर या मालिकेतील कलाकारांच्या गाड्या उभ्या केलेल्या असतात. शूटिंग आटोपलं की या मालिकेतील कलाकार मधुराला बाय केल्याशिवाय पुढे जातच नाहीत. हे कलाकार शूटिंग आटोपून निघाले की मधुरा घराबाहेर येते आणि राणादा, पाठकबाई, सनी, वहिनीसाहेब अशा कलाकारांशी हस्तांदोलन करते. गेल्या वर्षभरापासून न चुकता मधुरा अशाप्रकारे या कलाकारांना हात मिळवते. असा एकही दिवस गेला नाही की मधुरा या कलाकारांशी हस्तांदोलन केलं नाही. उलट मधुरा एखाद दिवस दिसली नाही तर या कलाकारांना चुकल्यासारखं वाटतं. मधुराचे या कलाकारांवरील प्रेम केवळ हस्तांदोलन करण्यापुरतं मर्यादित नाही. मधुराला या मालिकेतील कलाकारांचे डायलॉगही तोंडपाठ आहेत. Also Read:'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतला राणा दाचा हा स्टायलिश लूक कसा वाटला?