Join us

अखेर अरूंधतीनं बाजी मारलीच...! ‘आई कुठे काय करते’ मालिका पुन्हा नंबर 1 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 17:52 IST

Aai Kuthe Kay Karte, TRP Report : होय, गेल्या काही आठवड्यात नंबर 2 आणि 3 वर घसरलेली ‘आई कुठे काय करते’ ही मालिका पुन्हा नंबर 1 वर आली आहे.

नंबर वन मालिका बनण्यासाठी मालिकांमध्ये चढाओढ सुरू असते. टीआरपीच्या शर्यतीत (TRP Report) अव्वल राहायचं तर मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट आणले जातात. काही फसतात तर काही ट्विस्ट प्रेक्षकांना मनापासून आवडतात. ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत नुकताच एक ट्विस्ट आला आणि प्रेक्षकांनी पुन्हा एकदा ही मालिका डोक्यावर घेतलीये. होय, गेल्या काही आठवड्यात नंबर 2 आणि 3 वर घसरलेली ही मालिका पुन्हा नंबर 1 वर आली आहे.या आठवड्याच्या टीआरपी रिपोर्टनुसार, आई कुठे काय करते ही मालिका ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेसोबत पहिल्या क्रमांकावर आली आहे.

स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित होणारी ‘आई कुठे काय करते’ अल्पावधीत लोकप्रिय झाली. आपली सगळी स्वप्न, इच्छा आकांक्षा सगळं विसरून अरूंधती कुटुंबासाठी झटते.  परंतु कुटुंबाला त्याची जाणीवही नसते. नवºयापासून सगळेच तिला कमी लेखतात. तिच्या या आयुष्यात कसोटीचे क्षण येतात. आपलंस वाटणारं कथानक आणि तेवढीच आपलीशी वाटणारी पात्र यामुळे ही मालिका घराधरातील गृहिणींची आवडती मालिका बनली आहे. 

नव्या ट्विस्टमुळे टीआरपी वाढला गेली अनेक महिने ही मालिका टीआरपी चार्टवर सतत नंबर एकवर होती. परंतु गेल्या काही आठवड्यांपासून मालिकेचा टीआरपी रेस घसरला होता. ही मालिका दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आली होती. तर याच वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका पहिल्या क्रमांकावर होती. मात्र ताज्या   टीआरपी रिपोर्टनुसार ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेसोबत ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने पुन्हा एकदा नंबर 1 हे स्थान मिळवलं आहे.

 नवा ड्रामा, नवा ट्विस्ट आता मालिकेत नवा हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो आहे.  नुकतंच  अरुंधतीने देशमुखांचं घर सोडलं आहे. घरावरील हक्कही सोडला आहे. यावेळी तिला आशुतोषची खंबीर साथ मिळाली आहे.  हळूहळू  आशुतोषच्या मनात अरूंधतीविषयी प्रेम भावना निर्माण झाली आहे. आता तो थेट देशमुख कुटुंबासमोर  अरुंधतीवरील आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटीआरपीस्टार प्रवाहटिव्ही कलाकारटेलिव्हिजन