स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla)ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका टीआरपीच्या रेसमध्येदेखील अग्रेसर असते. या मालिकेतील दीपा या पात्राला प्रेक्षकांची जास्त पसंती आहे. तिच्या प्रेमळ, निस्वार्थी आणि माणूसकीच्या स्वभावाने रसिकांना आपलेसे केले आहे. दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे(Reshma Shinde)ने साकारली आहे. या मालिकेनंतर तिचा फॅन फॉलोव्हिंगदेखील खूप वाढला आहे. तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. दरम्यान नुकतीच सोशल मीडियावर रेश्मा शिंदे दुसऱ्या मालिकेतील अभिनेत्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. हा अभिनेता म्हणजे 'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' (Swabhiman Shodh Astitvacha) मालिकेतील शांतनु म्हणजेच अक्षर कोठारी (Akshar Kothari).
अक्षर कोठारे याने देखील शांतनुची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. शांतनु आणि दीपा हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. या दोघांनी चाहूल या मराठी चित्रपटात एकत्र काम केले आहे. या दोघांची खूप छान ओळख झाली असून पुढे ही ओळख मैत्रीत रूपांतरित झाली. अक्षर कोठारीने इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत प्रश्नोत्तरांचे एक सेशन केले होते. तेव्हा एका चाहत्याने अक्षरला तो आणि रेश्मा रिलेशनशीपमध्ये आहात का? असा प्रश्न विचारला होता. तर या प्रश्नावर उत्तर देत अक्षरने रेश्मा शिंदेला टॅग करत ‘कोई कहे कहता रहे कितना भी हमको दीवाना’ हे गाणे अॅड केले होते.
त्यानंतर या प्रश्नावर रेश्माने देखील आपली प्रतिक्रिया स्माईली इमोजी टाकून व्यक्त केली आहे. त्यानंतरच ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले. ते दोघे खरोखरच रिलेशनशीपमध्ये आहेत का, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.