Join us

राणी मुखर्जीने दिला सलमान खानला लग्न न करताच बाप बनण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 17:06 IST

दस का दम या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राणी मुखर्जी सलमानला सांगत आहे की, तू लग्न सोड आणि आता मुलांना जन्म दे.

सलमान खानचादस का दम हा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमाच्या या सिझनमध्येही सलमान खानच सूत्रसंचालकाची भूमिका बजावत असून प्रेक्षकांना त्याचे सूत्रसंचालन प्रचंड भावत आहे. या कार्यक्रमाच्या गेल्या भागामध्ये बॉबी देओल आणि धर्मेंद्र यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात ते यमला पगला दिवाना फिर से या चित्रपटाचे प्रमोशन करायला आले होते. या वेळी त्यांनी सलमान खानसोबत खूप धमाल मस्ती केली. त्यांच्या नंतर आता या भागात शाहरुख खान आणि राणी मुखर्जी हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमात येऊन राणी मुखर्जी सलमानला खूपच छान सल्ला देणार आहे.

दस का दम या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राणी मुखर्जी सलमानला सांगत आहे की, तू लग्न सोड आणि आता मुलांना जन्म दे. हे ऐकून दस का दम या कार्यक्रमाच्या सेटवर चांगलाच हास्यकल्लोळ झाला. दस का दम या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाहरुख आणि सलमान या बॉलिवूडमधील दोन सुपरस्टारना कित्येक दिवसांनंतर प्रेक्षकांना एकत्र पाहाता येणार आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान सलमान आणि शाहरुखमध्ये एक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत त्या दोघांनाही टेडी बेअरना पँट घालायची आहे. या कॉम्पिटिशनमध्ये सलमान जिंकणार असून तो खूपच कमी वेळात हे काम करणार आहे. सलमानने खूपच कमी वेळात केलेले हे काम पाहाता राणी त्याला सांगणार आहे की, ओह माय गॉड... तू लग्न सोड आणि मुलांनाच जन्म दे... 

सलमान, शाहरुख आणि राणी मुखर्जी हे तिघे मिळून शाहरुखच्या चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातील लुंगी डान्स या गाण्यावर थिरकणार आहेत. हा भाग प्रेक्षकांना १ सप्टेंबरला पाहायला मिळणार आहे. 

सलमानने काही दिवसांपूर्वी एका लोकप्रिय मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत बाप बनण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मला लवकर मूल हवे आहे. वेळ वेगाने निघून जातोस, असे मला वाटत नाही. मला फक्त एवढेच ठाऊक आहे की, मी ७० वर्षांचा असेल तेव्हा माझा २० वर्षांचा मुलगा असेल. मला येत्या काळात किंवा येत्या दोन-तीन वर्षांत मुलं हवे आहे. याचे कारण केवळ एकच आहे. ते म्हणजे, माझ्या आई-बाबांना माझे मुलं पाहता यावे, असे सलमान यावेळी म्हणाला होता.

टॅग्स :सलमान खानदस का दमराणी मुखर्जीशाहरुख खान