अभिनय क्षेत्रातले अनेक कलाकारांचे भाऊ -बहिण यांनी त्यांच्या भावंडाप्रमाणे अभिनय नाही तर इतर क्षेत्रात नाव कमावत असल्याची अनेक उदाहरणं आहेत. तर काही कलाकार आवड म्हणून अभिनयात काम करतात.कलाकार मंडळी मालिका आणि सिनेमात अभिनय करण्याबरोबरच इतर गोष्टींमध्येही विशेष लक्ष देऊ लागले आहेत. अभिनयासह स्वतःचा बिझनेस सुरु करण्याचा हा ट्रेंड आता मराठी कलाकरांमध्येही रुढ झाला आहे. एकाच क्षेत्रावर अवलंबून न राहता दुसरा व्यवसाय करण्यातही बिझी असतात.
‘राजा राणीची ग जोडी’ ही मालिकने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली आहे. मालिकेचे कथानक आणि दमदार अभिनय यामुळे मालिकेतील कलाकारही रसिकांचे आवडते बनले आहेत. त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात रसिकांची इच्छा असते. या मालिकेत संजू आणि रणजित यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना अतिशय आवडते.
रणजीत ढाले पाटील याला या मालिकेत दादासाहेब हा मोठा भाऊ तर सुजित ढाले पाटील हा लहान भावाची भूमिका साकरत आहे. रणजीत या भूमिकेनेही रसिकांची विशेष पंसती मिळवली आहे. या भूमिकेचे विशेष कौतुक करताना चाहते दिसतात. ऑनस्क्रीन भावावर जीव ओवाळून टाकणारा रणजीत म्हणजेच मणिराज पवारलाही खऱ्याआयुष्यातही लहान भाऊ आहे.
ऑनस्क्रीन ज्याप्रमाणे रणजीतचे आपल्या भावावर प्रेम आहे, त्याचप्रमाणे खऱ्या आयुष्यातही त्याचे आपल्या भावावर प्रचंड प्रेम आहे.रणजित म्हणजेच माणिराज पवारच्या लहान भावाचे नाव राजेश्वर पवार असे आहे.राजेश्वरने आपल्या मोठ्या भावाप्रमाणे अभिनयक्षेत्रात न येता. दुसऱ्याच क्षेत्रात आपले करिअर घडवले आहे.राजेश्वरने कुठेही नोकरी करत नसून त्याने स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे.
राजेश्वर स्टुडिओ आर्किटेक नावाची स्वतःची कंपनी सुरु केली आहे. राजेश्वर या कंपनीचा मालक आहे. राजेश्वरलाही कलेची आवड आहे. फोटो काढणे आणि संगीताचीही त्याला प्रचंड आवड आहे. राजेश्वर आणि मणिराज दोघांमध्ये खूप चांगले बॉन्डीग आहे. दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असतात. दोघांचे एकेमेकांसह अनेक फोटो तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील.