Join us

सर्व विरोधात, पण ती देतये साथ, स्वत:ला MRS अलाहाबादिया म्हणणारी ही तरूणी कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 13:58 IST

ही तरुणी स्वत:ला MRS अलाहाबादिया म्हणते.  पण, ती नेमकी आहे कोण? याबद्दल जाणून घेऊया. 

Ranveer Allahbadia: समय रैनाचा कॉमेडी शो 'इंडियाज गॉट लेटेंट' (India's Got Latent Controversy ) या शोमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.  लोकप्रिय युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया हा पालकांविषयी अश्लील वक्तव्य केल्यामुळे ट्रोल होत आहे. रणवीरविरोधात संतापाची लाट उसळली असून सर्व स्तरातून टीका केली जात आहे.  रणवीरने माफी मागितल्यानंतरही हे प्रकरण काही थंडावताना दिसत नाहीये. या सगळ्यात एका तरुणीने रणवीरसोबत 'हग डे' (HUG DAY) साजरा केला आहे. ही तरुणी स्वत:ला MRS अलाहाबादिया म्हणते.  पण, ती नेमकी आहे कोण? याबद्दल जाणून घेऊया. 

एकीकडे सर्वच रणवीर अलाहाबादियाविरोधात असताना ही तरुणी मात्र त्याच्यासोबत आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती रणवीरच्या फोटोला मीठी मारताना दिसतेय. तिच्या खोलीत रणवीर अलाहाबादियाचे अनेक फोटो दिसून येत आहे. "प्रेम हे बरोबर आणि चूक, चांगले आणि वाईट यांच्या पलीकडे असतं. सामाजिक परिस्थिती, मतं, निर्णय, संपत्ती, सत्ता, प्रतिष्ठा, प्रसिद्धी आणि सर्व सांसारिक परिस्थितींच्या पलीकडे अस्तित्वात आहे. जेव्हा हे सर्व नाहीसं होतं, तेव्हा जे उरते ते शुद्ध, अढळ प्रेम असतं. प्रेम हे फक्त प्रेम असते. आणि मी माझ्या स्वामींवर अमर्याद प्रेम आहे.  'हग डे'च्या शुभेच्छा", असं म्हणत तिनं रणवीरवरील आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

स्वतःला मिसेस अलाहाबादिया म्हणवणारी ही तरुणी रणवीरची चाहती आहे. तिचं नाव रोहिणी आरजू असं आहे. रणवीरवर तिचं एकतर्फी प्रेम आहे. तिने स्वतःला रणवीरची पत्नीही मानलं आहे. एवढंच नाही तर रणवीरसाठी तिनं करवा चौथचा उपवास देखील केला होता. त्याचे फोटोहीत तिनं शेअर केले होते.  तिनं रणवीरच्या नावाचा टॅटूही काढलेला आहे. 

टॅग्स :रणवीर अलाहाबादियासेलिब्रिटीटेलिव्हिजनयु ट्यूब