'डिटेक्टिव्ह दीदी’साठी रॅपर हार्ड कौरने देऊ केला आपला आवाज!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 6:46 AM
‘झी टीव्ही’वरील ‘डिटेक्टिव्ह दीदी’ ही बंटी शर्मा नावाच्या एका उत्साही महिला पोलिस अधिकाऱ्याची कथा असून आपल्या शहरातील नागरिकांना सर्व ...
‘झी टीव्ही’वरील ‘डिटेक्टिव्ह दीदी’ ही बंटी शर्मा नावाच्या एका उत्साही महिला पोलिस अधिकाऱ्याची कथा असून आपल्या शहरातील नागरिकांना सर्व प्रकारे सुरक्षित राखण्याच्या ध्येयाने बंटीला पछाडलेले असते. ही भूमिका सोनिया बालाणी ही अभिनेत्री रंगवीत असून या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ती गेले काही महिने दिल्लीतच तळ ठोकून आहे. या मालिकेत तिने काही थरारक स्टंटप्रसंग साकार करून प्रेक्षकांना थक्क केले आहे.या मालिकेला एक संगीत साज चढविण्यासाठी रॅप गायिका हरदीप कौरची निवड करण्यात आली असून तिने अलीकडेच या मालिकेसाठी एका गाण्याचे ध्वनिमुद्रण केले. बंटी शर्मा ऊर्फ डिटेक्टिव्ह दीदी (सोनिया बालाणी) ही गुन्हेगारांपासून लोकांचे संरक्षणा करते आणि त्यांना न्याय मिळवून देते, त्याचे वर्णन या रॅप गाण्यात करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल असे आहेत, “चाँदनी चौक का बच्चा बच्चा… करें फुल्ल ऑन तारीफ इसकी… सब कहते है सुपरगर्ल इसे… मोहल्ला में टशन है इसकी… डिटेक्टिव्ह दीदी!”या रॅप गाण्यावर अभिनय करताना आनंदलेली सोनिया म्हणाली, “हार्ड कौरने आमच्या मालिकेचं शईर्षकगीत गायलं, ही फार आनंदाची गोष्ट आहे. माझ्या बंटी शर्मा या व्यक्तिरेखेप्रमाणेच हार्डची वास्तव जीवनात आणि आपल्या गाण्यांची तिची वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे आणि तिने या मालिकेसाठी आपला आवाज देऊ केला ही गोष्ट अगदी योग्यच म्हणावी लागेल. तसंच मी आजवर एखाद्या मालिकेचं शीर्षकगीत कधी रॅप प्रकारात ऐकलेलं नाही. आमच्या मालिकेने प्रथमच शीर्षकगीत रॅप प्रकारात सादर केल्यामुळे मी स्वत:ला सुदैवी समजते.” या शोमध्ये डिटेक्टिव्ह दीदी ऊर्फ बंटी शर्माची भूमिका सोनिया बालानी साकारत असून आपल्या व्यक्तिरेखेमध्ये शिरण्यासाठी ती खूप मेहनत घेत आहे. आपला बिनधास्तपणा आणि बारकाईने लक्ष देण्याच्या वैशिष्ट्यांमुळे बंटी ह्या शोमध्ये दिल्लीच्या गोटातून सीरियल किलर्स, अव्वल गुन्हेगार आणि गँगस्टर्सशी निगडीत गुन्ह्यांची उकल करत आहे.या व्यक्तिरेखेसाठी सोनियाच्या बाजून पुष्कळ मानसिक आणि शारीरिक परिश्रमांची गरज असून यातील अॅक्शन दृश्ये मास्टर करण्यासाठी खास प्रशिक्षण घेत आहे. तिने आत्मसंरक्षणाचे धडे घ्यायलाही सुरूवात केली असून तञ्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मार्शल आर्ट्समध्येही तिला प्रशिक्षण घ्यायचे आहे.