Join us

'रात्रीस खेळ चाले2'मधील या सदस्याचे झाले निधन, अपूर्वा नेमळेकरने सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 1:07 PM

शेवंताच्या भूमिकेत असणाऱ्या अपूर्वाने सोशल मीडियाद्वारे या सदस्याच्या निधनाविषयी सांगितले आहे.

ठळक मुद्देओम भाई हे आमच्या सेटवर चहा कॉफी साठी स्पेशल होते. सेटवर अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले... म्हणून आम्ही त्यांना दवाखान्यात नेलं. पण उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

रात्रीस खेळ चाले या मालिकेचा पहिला सिझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. याच सिझनप्रमाणे या मालिकेच्या दुसऱ्या सिझनला देखील प्रेक्षकांची लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या प्रत्येक व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या मालिकेच्या यशात या मालिकेच्या कलाकारांइतकाच तंत्रज्ञ मंडळींचा तसेच मालिकेच्या निगडित प्रत्येक व्यक्तीचा हात आहे. या मालिकेच्या टीममधील एका सदस्याचे नुकतेच निधन झाले असून या मालिकेत शेवंताच्या भूमिकेत असणाऱ्या अपूर्वाने सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे.

अपूर्वाने इन्स्टाग्रामला पोस्ट लिहिली असून त्यात म्हटले आहे की, रात्रीस खेळ चाले २ ही तुमची लाडकी मालिका, त्यातले सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या कामाला सुरुवात व्हायची ती म्हणजे ओम भाई यांच्या हातच्या चहा आणि कॉफीने.

ओम भाई हे आमच्या सेटवर चहा कॉफी साठी स्पेशल होते. ८.२ .२०२० ला त्यांनी नेहमीप्रमाणे संध्याकाळी चार वाजता चहा कॉफी दिली आणि अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले... म्हणून आम्ही त्यांना दवाखान्यात नेलं. पण उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

रात्रीस खेळ चाले १ आणि २ या दोन्ही मालिकेतल्या सर्व टीमला त्यांनी तरोताजा केले. म्हणून आम्हा सर्वांना त्यांची उणीव कायम भासत राहील. त्याच्या पश्चात पत्नी , तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या लहान मुलांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या बायकोवर येऊ नये म्हणून आमच्या रात्रीस खेळ चाले या मालिकेतील टीमने असा विचार केला की कोणाला शक्य होईल तेवढा निधी आपण ओम भाई यांच्या परिवारासाठी जमा करू.

आपणांस सांगु इच्छिते की, तुम्हाला जर काही निधी द्यायचा असेल तर मी खाली त्यांच्या मुलीच्या अकाऊंटची माहिती दिली आहे. आम्हाला माहिती आहे तुम्ही अवश्य मदत कराल. धन्यवाद. 

टॅग्स :रात्रीस खेळ चालेअपूर्वा नेमळेकर