Join us

‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिका संपली, शेवंता गहिवरली...! इन्स्टा लाईव्हमध्ये चक्क रडली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 11:36 AM

‘रात्रीस खेळ चाले 2’ घेतला प्रेक्षकांचा निरोप

ठळक मुद्दे 27 डिसेंबर 1988 रोजी मुंबईच्या दादर येथे जन्मलेल्या अपूर्वाने किंग जॉज विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर नॅशनल कॉलेज वांद्रे आणि रूपारेल कॉलेजात तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले.

रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकलीत. या मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केलेय.  शेवंता आणि अण्णांच्या अदाकारीचे तर चाहते डाय हार्ट फॅन बनलेत. शेवंताची एन्ट्री झाल्यानंतर मालिकेची लोकप्रियता आणखीच वाढली. पण आता प्रेक्षकांच्या या आवडत्या मालिकेने निरोप घेतला आहे.  29 आॅगस्टला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला आणि शेवंता अर्थात अपूर्वा नेमळेकर कमालीची भावूक झाली.इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट लिहून तिने आपल्या भावना व्यक्त केल्यात. लाईव्ह सेशनमध्ये तिला अश्रू रोखता आले नाहीत.

आपलं प्रेम आणि प्रतिसाद मिळत रहावा...

‘आपली लाडकी मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले 2 ही मालिका आपला निरोप घेत आहे. आता तो वाडा नसणार, आता शूटींग नसणार... खूप भावना दाटून आल्या आहेत. तुम्ही मला भरभरून प्रेम दिले. मी साकारलेल्या शेवंता या व्यक्तिरेखेवर प्रेम केलेत.  या मालिकेचा अविभाज्य भाग म्हणून मला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानते. मालिका संपली हे स्वीकारणे कठीण जातेय. पण या मालिकेने मला खूप काही शिकवले. हा अनुभव प्रेरणादायी होता. कुठलेही काम शेवटच्या टप्प्यात येते तेव्हा, त्याबद्दल मनात आपुलकी आणि अभिमानाची भावना दाटून येतेय. आज तसेच काही वाटतेय. शेवंताची भूमिका रंगवताना माझ्या अभिनयाचे अनेक पैलू लोकांना दिसले. या मालिकेतून मला मायबाप प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी झी वाहिनीचे, दिग्दर्शक, निर्माता, लेखकांचे सर्वांचे आभार मानते. माझ्या शेवंता या भूमिकेला तुम्ही जसे प्रेम दिले, ते यापुढेही कायम राहिल, अशी आशा करते. एक कलाकार या नात्याने मी आयुष्यभर प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिन, बस तुमची साथ कायम राहावी हीच विनंती. माझा पॅकअप झाल्यानंतर काढलेला हा आशीर्वाद स्वरूप फोटो आणि आज मस्तिष्कावर पडलेले ही पुष्प पाकळी यांने माझे मन गहिवरून गेले, ’असे अपूर्वाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

टॅग्स :रात्रीस खेळ चालेअपूर्वा नेमळेकर