Join us

पुन्हा एकदा रंगणार रात्री खेळ चाले ३, अण्णा नाईकांच्या एंट्रीने भरणार धडकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 13:45 IST

Anna naik is back on small screen : खुनाचा थरार आणि आत्माचा वावर या सगळ्या घटनांनी प्रेक्षकांना दोन्ही सिझनमध्ये खिळवून ठेवलं.

अण्णा नाईक परत येतायेत. स्मॉल स्क्रीनवर ज्या अण्णा नाईकांचा दरारा होता ते अण्णा नाईक आता परत येतायत.  नाईकांच्या वाड्यातलं गूढ हे प्रत्येक वेळी प्रेक्षकांना खिळवून ठेवत आणि आता अण्णा नाईकच परत येतायत म्हटल्यावर प्रेक्षकांसमोर नवा ट्विस्ट असणारेय. कारण रात्रीस खेळ चाले पार्ट २ मध्ये अण्णा नाईकांचा मृत्यू दाखवला होता. त्यामुळे 'सीझन3' मध्ये अण्णा नाईकच परत येतायत म्हटल्यावर रहस्याची शृंखला नव्या सिझनमध्येदेखील पाहायला मिळणारेय. नाईकांचा वाडा, त्या वाड्यात घडणा-या एकामागोमाग गूढ गोष्टीखुनाचा थरार आणि आत्माचा वावर या सगळ्या घटनांनी प्रेक्षकांना दोन्ही सिझनमध्ये खिळवून ठेवलं. रात्रीस खेळ चाले या सिरीअलमधील पार्ट वन मध्ये प्रॉपर्टीसाठी चाललेल घरातील राजकारण, खून प्रकरण समोर आलं होतं.घरातील सूनच सगळे खून करत असते हे  शेवटी समोर येत. तर पार्ट टू मध्ये अण्णा नाईकांच्या घरातील गोष्ट २० वर्षे मागे दाखवण्यात आली होती.२० वर्षांपूर्वी दत्ता, सुष्मा, अभिराम, छाया, दत्ता, वच्छी, पांडू, अण्णा नाईक, माई, शेवंता यांची रहस्यमय कहाणी समोर आली होती.

 या सिरीअलमधील आणखी एक इंटरेस्टिग गोष्ट म्हणजे अण्णा नाईक आणि त्यांचे सिरिअलमधील रहस्यामय लव्ह अफेअर.अण्णांच्या अनेक अफेअरची चर्चा गेली. मात्र सगळ्यात जास्त गाजलं ते शेवंता प्रकरण.शेवंता आणि अण्णांच्या लव्ह अँगलने मालिकेत आणखी रंगत आणली.

'सिझन2' मध्ये अण्णा नााईक, शेवंता यांचा मृत्यू दाखवण्यात आला होता.पण सिझन ३ च्या टीझरमध्ये अण्णा नाईक दाखवण्यात येतायत. त्यामुळे नव्या पर्वात काय पाहायाला मिळेल याची उत्सुकता लागून राहिलीय. 

टॅग्स :रात्रीस खेळ चाले