Join us

रात्रीस खेळ चाले ३ मालिकेतील गणेशोत्सव विशेष भागात एक वेगळा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 9:00 AM

गणेशोत्सव हा आपल्यामध्येच एक वेगळा अनुभव असतो त्यामुळे कोकणात जसा पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा होतो त्याचा अनुभव प्रेक्षक या मालिकेतून अनुभवता येणार आहे.

सर्वत्रच आसमंतामध्ये घुमतोय मोरयाचा जयजयकार आणि पुन्हा तशीच भक्ती. टीव्ही मालिकेतही गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जातोय.  मालिकेच्या सेटवर उपस्थित प्रत्येकजण बेधुंद होऊन बाप्पाची मनोभावे सेवा करतात. सर्वच मंडळी बाप्पाच्या भक्तीमध्ये का बरं तल्लीन होतात. छोट्या पडद्यावरही  बाप्पा मोरयाचा गजर ऐकायला मिळतोय. वेगवेगळ्या मालिकांच्या सेटवर मोठ्या उत्साहात बाप्पाची आराधना केली जातेय. 

'रात्रीस खेळ चाले ३' मालिकेच्या सेटवरही बाप्पा विराजमान झालेत.याच दरम्यान मालिकेचे छाया चित्रकार गणेश कोकरे यांनीही आगळा वेगळा अनुभव शेअर केलाय.'रात्रीस खेळ चाले' आणि 'गाव गाता गजाली' या मालिकांमुळे प्रेक्षकांना कोकणच्या सौंदर्याने अधिक भुरळ घातली आणि हे कोकण ज्यांचा नजरेने टिपलं ते कॅमेरामन गणेश कोकरे. सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत सेट वर हसत खेळत अनेक दृश्य टिपणाऱ्या  गणेश कोकरे ह्यांनी कोकणातल्या गणेशोत्सवाच चित्रीकरण करताना असाच एक आगळा वेगळा प्रयोग केला. 

कोकणातली परंपरा असणाऱ्या फुगड्या चित्रित करताना छाया चित्रकार गणेश कोकरे ह्यांनी एका हातात कॅमेरा आणि तर दुसऱ्या हाताने कलाकारांसोबत फुगडी घालून चित्रीकरण केलं. ज्यामुळे उत्तम चित्रीकरण झालच शिवाय एक वेगळा अनुभव, वेगळा आनंद सगळ्यानाच मिळाला आणि हा आनंद तुम्हाला अनुभवता येणार आहे रात्रीस खेळ चाले 3 च्या गणपती विशेष भागात. 

इतकंचं नव्हे कोकणातील गणेशोत्सव हा आपल्यामध्येच एक वेगळा अनुभव असतो त्यामुळे कोकणात जसा पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा होतो त्याचा अनुभव प्रेक्षक या मालिकेतून अनुभवता येणार आहे.

टॅग्स :रात्रीस खेळ चाले ३गणेशोत्सव