झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. या मालिकेनं काही महिन्यांपूर्वी निरोप घेतला असला तरीदेखील या मालिकेतील कलाकारांनी रसिकांच्या मनात घर केलं आहे. आता या मालिकेचा दुसरा भाग येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. वाहिनीनं अधिकृत कुठेही सांगितलं नाही. मात्र रवी जाधवच्या इंस्टाग्राम पोस्टवरून या चर्चेला उधाण आलं आहे.
रवी जाधव यांनी गायत्री दातारसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं की, तुला पाहते रे भाग २. लवकरच येणार. यासोबतच रवी जाधवने सनडेफनडे, जस्ट जोकिंग व शूटिंग असे हॅशटॅग टाकले आहेत.
आता हॅशटॅग वरून तर स्पष्ट झालं की तुला पाहते रेचा दुसरा भाग येत नाही आहे. मात्र गायत्री दातार व रवी जाधव कोणत्या तरी प्रोजेक्टवर एकत्रित काम करत आहेत. ते कोणतं ते लवकरच समजेल. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर रवी जाधव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला नवा चित्रपट घेऊन लवकरच येणार आहे. अद्याप याबद्दल कोणताच खुलासा केलेला नाही.