Join us

विधीलिखितासोबत असलेली लढाई राया जिंकणार; यशस्वीपणे वाचवणार कृष्णाचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 18:58 IST

Man zal bajind: राया कृष्णाला वाचवण्यासाठी चालत्या ट्रकसमोर उडी मारतो आणि तो ट्रक थांबवायचा प्रयत्न करतो.

सध्या छोट्या पडद्यावर मन झालं बाजिंद ही मालिका चांगलीच गाजत आहे.ही मालिका सुरु झाल्यापासून कृष्णा सातत्याने तिच्या नशिबाशी झगडत आहे. रायाशी लग्न केल्यानंतर अनेकदा तिच्या जीववर बेतणारी संकट आली. मात्र, या संकटांना तिने परतून लावलं. यामध्येच आता कृष्णावर आणखी एक मोठं संकट येणार आहे. मात्र, यावेळीदेखील राया तिच्यावर आलेलं संकट स्वत:वर घेत तिचे प्राण वाचवणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये गुली मावशी, अंतरा आणि रितिक कृष्णाला जीवे मारण्यासाठी पूर्ण प्लॅन करतात. इतकंच नाही तर तिचं अपहरण करुन तिला ट्रक खाली मारण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या गोष्टीची माहिती रायाला मिळाल्यावर तो कृष्णाला वाचवण्यासाठी जातो.

दरम्यान, राया कृष्णाला वाचवण्यासाठी चालत्या ट्रकसमोर उडी मारतो आणि तो ट्रक थांबवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आता या सगळ्यात राया कृष्णाला वाचवू शकेल का? की तिला वाचवणं त्याच्याच जीवावर बेतेल? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार