अभिनेता अद्वैत दादरकर 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेत सोहमच्या भूमिकेत झळकत आहे. अद्वैतही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याच्या भूमिकेविषयी आणि खासगी आयुष्यातील खास घडामोडी चाहत्यांसह तो शेअर करतो. अद्वैतचाही सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर तो करतो.
पण आता अद्वैत दादरकरच्या चाहत्यांसाठी निराश करणारी बातमी आहे. कारण अद्वैतनेही आता सोशल मीडियावरुन ब्रेक घेतला आहे. लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामला त्याने राम राम ठोकलाय. आता तो परत कधी येईन याचेही उत्तर त्याने दिलेले नाही. त्यामुळे इन्स्टा फॅन्सना त्यांचा आवडता अभिनेता अव्दैतचे दर्शन घडणार नाही हे मात्र नक्की.
अद्वैतला सोशल मीडियाचा कंटाळा आला होता. याच कारणामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर त्याने या संदर्भातली एक पोस्ट शेअर केली होती. अकाऊंट डिएक्टीव्ह करत आहे. माहित नाही किती काळासाठी, कधी परत येईन. मी ओके आहे. त्यामुळे काय झाले विचारायला फोन करु नये.अशी पोस्टच अव्दैतने लिहीली होती.
अद्वैतने या आधी 'माझ्या नव-याची बायको' मालिकेतही भूमिका साकारली होती. त्यानतंर तो सोहम भूमिकेतून 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेत झळकत आहे. मालिका सुरु झाली तेव्हा पासून रसिकांनी नाराजी व्यक्त केली होती. इतकेच काय तर सोमहचा पहिला लूक समोर आला तेव्हा रसिकांचा प्रचंड हिरमोड झाला होता.
त्याची भूमिक त्यांचा लूक पाहून चाहत्यांची पुरती निराशाच झाली होती. त्यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आले होते. मालिकेत दिवसेंदिवस रंजक वळणं दाखवण्यात येत असली तरी रसिकांचे मनोरंजन करण्यात मालिकेला हवे तसे यश मिळाले नसल्याचे दिसतंय.