या कारणाने अलीची उडाली झोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2016 11:00 AM
मालिकांचे चित्रीकरण हे कित्येक तास सुरू असते. दिवसातील 12-14 तास कलाकार चित्रीकरणाला देत असतात. एकाच मालिकेच्या चित्रीकरणाला येवढा वेळ ...
मालिकांचे चित्रीकरण हे कित्येक तास सुरू असते. दिवसातील 12-14 तास कलाकार चित्रीकरणाला देत असतात. एकाच मालिकेच्या चित्रीकरणाला येवढा वेळ लागत असल्याने कलाकार सहसा दुसरी मालिका स्वीकारताना हजारवेळा विचार करतात. पण अली गोणीने एक मालिका करत असताना दुसरी मालिका स्वीकारून त्याची रात्रीची झोपदेखील घालवली आहे.अली ये है मोहोब्बते या मालिकेत काम करत असल्याने त्याचा सगळा वेळ हा चित्रीकरणातच जातो. त्यामुळे तो दुसरी कोणतीच मालिका स्वीकारत नव्हता. पण बहू हमारी रजनि_कांत या मालिकेची लेखिका आणि निर्माती सोनाली जाफर ही त्याची चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे आपल्या या मित्राने आपल्या कार्यक्रमात काम करावे अशी तिने इच्छा व्यक्त केली आणि आपल्या मैत्रिणीच्या शब्दाखातर अलीदेखील या मालिकेत काम करायला तयार झाला आणि त्यात या मालिकेत तो पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार असल्याने त्याला काहीच दिवसांचे चित्रीकरण करायचे होते. पण आता या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाल्यापासून त्याला एक मिनिटाचाही आराम मिळत नाहीये. त्याने नुकतेच दोन्ही मालिकांचे सलग 72 तास चित्रीकरण केले. याविषयी अली सांगतो, "मी सध्या दिवसा ये है मोहोब्बते या मालिकेचे तर रात्री बहू हमारी रजनि_कांत या मालिकेचे चित्रीकरण करत आहे. यामुळे माझ्या झोपेचे अक्षरशः खोबरे झाले आहे. पण या दोन्ही मालिकांचे चित्रीकरण करणे मी खूप एन्जॉय करत आहे. या मालिकेत मी एका खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. रजनी ही माझी पत्नी आहे असा दावा करून मी तिला माझ्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे."