या कारणामुळे कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमाला घ्यावा लागला होता निरोप... वाचा 2016मध्ये छोट्या पडद्यावर रंगलेले अनेक वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2017 1:24 PM
2016 या वर्षात छोट्या पडद्यावर अनेक वाद रंगले. तसेच या वर्षांत अनेक धक्कादायक घटना घडल्या. छोट्या पडद्यावरीलकोणत्या गोष्टींमुळे ...
2016 या वर्षात छोट्या पडद्यावर अनेक वाद रंगले. तसेच या वर्षांत अनेक धक्कादायक घटना घडल्या. छोट्या पडद्यावरीलकोणत्या गोष्टींमुळे 2016 वर्षं गाजले हे जाणून घेऊया...कपिल शर्मा आणि कलर्स वाहिनीमध्ये झालेला वाद कॉमेडी नाइट्स विथ कपिल हा कलर्स वाहिनीवरील सगळ्यात जास्त टीआरपी असलेला कार्यक्रम होता. टिव्हीवरील पहिल्या पाच कार्यक्रमांमध्ये हा कार्यक्रम दर आठवड्याला असायचा. पण या कार्यक्रमाचा निर्माता आणि सूत्रसंचालक कपिल शर्मा आणि कलर्स वाहिनीचा चांगलाच वाद रंगला. कपिल आणि वाहिनीमध्ये करारावरून आणि पैशांमधून खटके उडाले असे म्हटले जाते. कपिलसोबत वाद झाल्यानंतर कलर्स वाहिनीने कॉमेडी नाइट विथ कपिल हा कार्यक्रम बंद करून त्याऐवजी कॉमेडी नाइट्स बचाओ हा कार्यक्रम सुरू केला. कपिलचा कार्यक्रम बंद झाल्यानंतर कपिलच्या फॅन्सची चांगलीच निराशा झाली होती. पण काहीच महिन्यात कॉमेडी नाइट्स विथ कपिल या कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमला घेऊन कपिलने द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम सुरू केला आणि काहीच दिवसांत या कार्यक्रमालादेखील लोकांची चांगलीच पसंती मिळाली. प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्याप्रकरण बालिकावधू या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येमुळे सगळ्यांनाच चांगलाच धक्का बसला होता. 1 एप्रिलला प्रत्युषाने राहत्या घरी गळफास लावून तिचा जीवनप्रवास संपवला. तिच्या आत्महत्येला अनेक महिने झाले असले तरी तिने आत्महत्या का केली याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. तिचा प्रियकर राहुल राजने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असा आरोप राहुलवर लावण्यात आला होता. राहुल काही दिवस पोलिस कोठडीतदेखील होता. पण नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. राहुलने प्रत्युषाला वेश्याव्यवसायात ढकलेले होते असेदेखील म्हटले जाते. प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर तिला न्याय मिळवून देण्यासाठी सारा खान, काव्या पंजाबी अशा तिच्या अनेक मैत्रिणींनी प्रयत्न केला होता.कॉमेडी नाईट्स बचाओ ताजा कॉमेडी नाईट्स बचाओ ताजा हा कार्यक्रम 2016 या वर्षांत चांगल्या कारणांमुळे नव्हे तर वाईट कारणांमुळे चर्चेत राहिला. अभिनेत्री तनिष्टा चॅटर्जीच्या सावळ्या रंगावरून तिच्यावर या कार्यक्रमातील कॉमेडीयन कृष्णा अभिषेक आणि भारती सिंग यांनी टिप्पणी केली आणि त्यामुळे ती चिडून चित्रीकरण सोडून निघून गेली. तसेच जॉन अब्राहमचीदेखील या कॉमेडियन्सनी खिल्ली उडवल्यामुळे तो या कार्यक्रमाच्या चित्रीकरणातून निघून गेला होता. या कार्यक्रमात कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावरून विनोद केले जातात असे अनेक कलाकारांचे म्हणणे आहे. कृष्णाचा मामा अभिनेता गोविंदाने तर कॉमेडी नाइट्स बचाओ ताजा या कार्यक्रमात जाण्याऐवजी द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाला उपस्थिती लावणे पसंत केले होते. शिल्पा शिंदे, करण मेहरा आणि हिना खान ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत या वर्षात प्रेक्षकांना खूप बदल पाहायला मिळाले. हिना खान आणि करण मेहरा ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या सुरुवातीपासून या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत होते. पण नैतिकची भूमिका साकारणाऱ्या करणने तब्येतीचे कारण देऊन या मालिकेला रामराम ठोकला आणि त्यानंतर काहीच दिवसांत अक्षराची भूमिका साकारणाऱ्या हिना खानने ही मालिका सोडली. या मालिकेसोबतच भाभीजी घर पर है या मालिकेत अंगुरी भाभीची व्यक्तिरेखा साकारणारी शिल्पा शिंदे या मालिकेतून बाहेर पडली. या कार्यक्रमाच्या निर्मात्यांसोबत तिचा वाद झाला होता. शिल्पाने सिंटाकडे निर्मात्यांची तक्रारदेखील केली होती. पण सिंटाने निर्मात्यांची बाजू योग्य असल्याचे म्हटले. टिना दत्ता उतरण या मालिकेमुळे नावारूपाला आलेल्या टिना दत्ताने मुंबई-राजकोट या प्रवासात विमानातील तिच्या सहप्रवाशाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असा आरोप लावला होता. प्रवासादरम्यान टिनाला त्याने चुकीच्या पद्धतीने हात लावला होता. याबाबत तिने विमानाच्या कर्मचाऱ्यांना तक्रारदेखील केली होती. पण त्यांनी तिला मदत केली नसल्याचे तिने म्हटले होते.