Join us

'या' कारणामुळे माधुरी दीक्षित झाली भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 15:55 IST

कलर्सचा लोकप्रिय शो डान्स दिवाने सोबत ब्लॉबस्टर वीकेंडसाठी तयार व्हा कारण त्यात मागील काही वर्षातील बॉलिवूडचा प्रवास दाखविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमाधुरी मुघल-ए-आझम या लोकप्रिय प्रेमकथेमधील अनारकलीच्या भूमिकेत दिसणार

कलर्सचा लोकप्रिय शो डान्स दिवाने सोबत ब्लॉबस्टर वीकेंडसाठी तयार व्हा कारण त्यात मागील काही वर्षातील बॉलिवूडचा प्रवास दाखविण्यात येणार आहे. परीक्षक बॉलिवूड मधील विविध सिनेमातील प्रसिध्द अवतार धारण करणार आहेत त्याचप्रमाणे स्पर्धक सुध्दा अनेक अवतार धारण करणार आहेत. माधुरी दीक्षित मुघल-ए-आझम या लोकप्रिय प्रेमकथेमधील अनारकलीच्या भूमिकेत दिसणार आहे तर तुषार कालिया शोले सिनेमातील गब्बरच्या भूमिकेत दिसणार आहेत आणि शशांक खेतान हम या सिनेमातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेत दिसणार आहेत. या फिल्मी स्पेशलमध्ये मनोरंजनाचा तडका लगावण्यासाठी सोनाक्षी सिन्ही तिच्या आगामी हॅपी फिरसे भाग जायेगी या कॉमेडी नाट्य असलेल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मंचावर उपस्थित राहणार आहे. बॉलीवूड मधील प्रसिध्द सिनेमे आणि त्यातील पात्रांवर प्रत्येक स्पर्धक समर्पित भावनेने नृत्य करणार आहे. वंडर बॉय म्हणून नावाजला गेलेला प्रभदिप पुन्हा एकदा सर्वांना रिझवले आहे. त्याने मेरा नाम जोकर मधील राज कपूर यांची नक्कल करून जीना यहाँ मरना यहाँ हे नृत्य केले. या सिनेमात राज कपूर यांना पाहताना ज्या भावना प्रेक्षकांच्या मनात आल्या होत्या तशाच भावना त्याच्या नृत्याने आताही आणण्यात प्रभदिप यशस्वी झाला.

त्याच्या हृद्य भारावून टाकणाऱ्या कामगिरीची पाहणाऱ्या प्रत्येकाने प्रशंसा केली. माधुरीने अश्रूभरल्या डोळ्यांनी कसे सांगीतले ते, “प्रभदिपच्या नृत्याने माझा विश्वास पक्का केला आहे की प्रत्येक कलाकार त्याचे दुःख आणि अश्रू त्यांच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना आणि त्यांचे जीवन हलके करताना लपवून ठेवतो.आकर्षक सोनाक्षी सिन्हाने वंडर बॉयला एक मिठी मारली आणि अश्रूभरल्या डोळ्यांनी तिने सांगितले की कोणतीही परिस्थिती असो शो मस्ट गो ऑन.

टॅग्स :माधुरी दिक्षित