Join us

या कारणामुळे रिध्दिमा तिवारी चाहत्यांवर संतापली !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2017 10:16 AM

बॉलिवूड असो किंवा टीव्ही अभिनेत्रींनी घातलेल्या तोकड्य़ा कपड्य़ांवर किंवा त्या करीत असलेल्या अंगप्रदर्शनाबद्दल त्यांच्यावर टोमणे मारणे किंवा टीका करणे ...

बॉलिवूड असो किंवा टीव्ही अभिनेत्रींनी घातलेल्या तोकड्य़ा कपड्य़ांवर किंवा त्या करीत असलेल्या अंगप्रदर्शनाबद्दल त्यांच्यावर टोमणे मारणे किंवा टीका करणे ही नेहमीची बाब आहे.‘गुलाम’ मालिकेत माल्दावाली या मादक स्त्रीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रिध्दिमा तिवारी ही अशाच टीकेला बळी पडली आहे.या मालिकेत रिध्दिमाने एका भागात तोकडे कपडे घालत अंगप्रदर्शनकेल्याबद्दल तिच्यावर टीका करण्यात आली आहे. सुरुवातीला रिध्दिमाने सोशल मीडियावरील या टीकेकडे दुर्लक्ष केले; परंतु ही टीका जेव्हा तिच्या पालकांपर्यंत जाऊन पोहोचली, तेव्हा तिचा संयम तुटला. यानंतर तिने ‘इन्स्टाग्राम’वर अनेक व्हिडिओ अपलोड करत काही भारतीय पुरुषांच्या हीन मनोवृत्तीवर तिने सडेतोड उत्तर दिले आहे. यासंदर्भात रिध्दिमाकडे विचारणा केली असता, तिने सांगितले, “या मालिकेत मी एका मादक स्त्रीची व्यक्तिरेखा साकारत असल्याने पुरुषांचे लक्ष माझ्या भूमिकेकडे नाहीतर माझ्याकडे जाईल, हे अपेक्षितच आहे. लोक मला हॉट आणि सेक्सी म्हणतात आणि कामचं कौतुकही करतात. ती गोष्टही मी समजू शकते परंतु ते जेव्हा माझ्याकडे यापेक्षा घाणेरड्या नजरेने  माझ्याकडे बघतात,बोलतात तेव्हा मात्र मी त्याला आक्षेप घेते. काही पुरुषांना ‘क्लीव्हेज’, ‘ब्रेस्ट’, ‘पॅण्टी’ आणि ‘कंडोम’ या शब्दांची अ‍ॅलर्जी असते.या शब्दांमुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडतं,त्यांची मानसिक वाढच झालेली नसते. त्यांना या शब्दांनी पछाडलेलं असतं आणि ते व्यावसायिक जीवनाची खाजगी जीवनात सरमिसळ करतात.”रिध्दिमा म्हणाली, “कोणत्याही अभिनेत्रीला असे शारीरिक प्रदर्शनाचे प्रसंग साकारणं अवघड जात असतं, ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. त्याबद्दल तिचं कौतुक करणं तुम्हाला जमत नसेल, तर तिच्यासंदर्भात वाईट शेरेबाजी किंवा अश्लील विनोद करून किमान टीका तरी करू नका. आम्ही अभिनेत्री अशा बाबींकडे बहुदा दुर्लक्षच करतो,परंतु यावेळी या लोकांनी जेव्हा माझ्या कुटुंबियांवर टीका केली, तेव्हा मात्र मी दुखावले गेले. लोकांनी माझ्या व्यावसायिक जीवनाची सरमिसळ माझ्या खाजगी जीवनाशी करू नये. सोशल मीडिया लोकप्रिय होण्यापूर्वी मला रस्त्यावर महिलांशी गैरवर्तन करणा-या काही पुरुषांच्या वर्तणुकीशी सामना करावा लागला होता. अशा पुरुषांवर मी चक्क दगडही मारून फेकले होते.” एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री या लोकप्रिय बनल्यावर त्यांचं खाजगी जीवन संपुष्टात येतं, हे रिध्दिमाला मान्य आहे. ती सांगते की कधी कधी मात्र चाहते त्यांची मर्यादा पार करतात.“चाहत्यांना आपली सीमारेषा कुठे आहे, ते कधी कधी समजत नाही. बरेचदा ते कलाकारांचे व्यावसायिक जीवन आणि खाजगी जीवन यांची गल्लत करतात. चाहते हे भारी चौकस असतात; पण ते कधी कधी मालिकेशी संबंधित विचित्र प्रश्न विचारतात. आम्ही जर अशा प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत, तर ते आम्हालाच बरंवाईट बोलतात. चाहते आणि कलाकार यांच्यात काही अंतर राखणं गरजेचं आहे. चाहत्यांनीही आमच्या खाजगी जीवनाचा मान राखला पाहिजे,” असे रिध्दिमा म्हणाली.