Join us

या कारणासाठी बिग बॉसमध्ये परिधान केलेल्या गाऊनचा लिलाव करणार रुबिना दिलैक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 2:26 PM

बिग बॉसची विनर घोषित करण्यात आले त्या क्षण रुबीनाने आकर्षक गाऊन परिधान केला होता. या गाऊनमुळे तिच्या सौंदर्याला चारचाँद लागले होते.

टीव्हीवरचा सर्वात वादग्रस्त शो बिग बॉस १४ सिझन  अभिनेत्री रुबीना दिलैकनं  जिंकला होता. तर राहुल वैद्य बिग बॉस 14 चा उपविजेता ठरला होता.  राहुल वैद्य आणि रुबीना दिलैक यांच्यात शेवटपर्यंत काँटे की टक्कर होती. मात्र, शेवटी रुबीनानं बाजी मारत विजेतेपद मिळवलं होतं. बिग बॉस १४ मध्ये स्पर्धकांमध्ये सगळ्यात जास्त मतं रुबीनालाच मिळाल्यामुळे ती विजेती ठरली.

बिग बॉस १४ ची विजनेती बनल्यानंतर रुबीना दिलैकची लोकप्रियतेत आणखी भर पडली आहे. ती चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही सक्रीय असते. कधी फोटो तर कधी व्हिडीओ शेअर करत रुबीना चर्चेत असते. आता पुन्हा एकदा रुबीना दिलैक चर्चेत आली आहे. यावेळी एका वेगळ्याच कारणामुळे ती चर्चेत आहे. बिग बॉसची विजेतेदपद मिळवणं हे रुबीनासाठी स्वप्नवत होते. हा क्षण कायमच तिच्यासाठी स्पेशल राहणार आहे. खास क्षणाच्या खास गोष्टीही आपण तितक्याच आपुलकीने सांभाळून ठेवतो. मात्र रुबीना दिलैक असे करणार नाही. 

बिग बॉसची विनर घोषित करण्यात आले त्या क्षण रुबीनाने आकर्षक गाऊन परिधान केला होता. या गाऊनमुळे तिच्या सौंदर्याला चारचाँद लागले होते. अतिशय सुंदर ती दिसत होता. तो तिचा फेव्हरेट गाऊनपैकी असावा. आता त्याच गाऊनचा लिलाव रुबीना करणार आहे.  ट्रान्सजेंडर समुदायासाठी काम करणाऱ्या ऑनलाईन चॅरिटी सेलमध्ये तिच्या गाऊनचा लिलाव करण्याच्या विचारात रुबीना आहे.

रुबीनाच्या विचाराचं नक्कीच कौतुक व्हायला हवं. बिग बॉसच्या घरातही रुबीनाला रसिकांनी तिच्या चांगल्या कामामुळे पसंती दिली होती. विशेष म्हणजे रुबीना ‘शक्तीः अस्तित्व के एहसास की’मालिकेमध्ये झळकली होती. किन्नर बहुची भूमिका तिने साकारली होती. तेव्हपासूनच रुबिना टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री बनली होती. छोटी बहु या शोमधून रुबीना प्रकाशझोतात आली होती. घराघरात रुबीना आज लोकप्रिय आहे. 

टॅग्स :बिग बॉस १४