Join us

'साथ निभाना साथिया 2' हा मालिकेला कोकिलाबेन ठोकला राम-राम, जाणून घ्या या मागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2020 4:09 PM

मालिकेत कोकिलाबेन या भूमिकेला पहिल्या मालिकेत रसिकांची भरघोस पसंती मिळाली होती. त्यामुळे 'साथ निभाना साथिया 2'  मध्येही कोकिलाबेन उर्फ ​​रूपल पटेल यांनाच ही भूमिका देण्यात आली होती.

लॉकडाऊनमध्ये 'रसोडे में कौन था' या व्हिडीओने रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच दरम्यान 'साथ निभाना साथिया 2' मालिकाही सुरू करण्यात आली. मालिकेत कोकिलाबेन या भूमिकेला पहिल्या मालिकेत रसिकांची भरघोस पसंती मिळाली होती. त्यामुळे 'साथ निभाना साथिया 2'  मध्येही कोकिलाबेन उर्फ ​​रूपल पटेल यांनाच ही भूमिका देण्यात आली होती. मात्र रूपल पटेल यांनी या मालिकेसाठी केवळ २० एपिसोडचेच कॉन्ट्रॅक्ट साईन केले होते.

 

करारानुसार २० एपिसोडसचे शूटिंग संपले आहे. मिड नोव्हेंबरमध्ये कोकिलाबेन असलेल शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. त्यानंतर कोकिलाबेन दिसणार नाही. नक्कीच चाहत्यांसाठी ही बातमी नाराजी निर्माण करणारी आहे.मात्र लवकच वेगळ्याच भूमिकेतून रूपल पटेल पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे 'साथ निभाना साथिया 2'  मालिकेत त्यांचे दर्शन घडणार नसले तरीही वेगळ्या अंदाजात त्यांचे दर्शन घडणार हे मात्र नक्की. 

याविषयी रूपल पटेलने सांगितले की, मी सुरूवातीलाच निर्मात्यांना मर्यादित काळापर्यंतच काम करणार असल्याचे सांगितले होते. निर्मातेही तयार झाले तेव्हा माझ्या एका मालिकेचे शूटही बंद पडले होते. त्यामुळे या मालिकेत मर्यादित काळासाठी काम करण्याचे मी ठरवले होते. चाहत्यांच्या प्रेमापोटी मी या मालिकेत काम करण्यास तयार झाली होती. ठराविक काळासाठी का होईना पण मी चाहत्यांचे पूर्वीप्रमाणे कोकिलाबेन बनत मनोरंजन केले यातच आनंद आहे.

खरंतर मला अगदी कमी काळासाठी ही भूमिका करण्याचीही गरज नव्हती. मात्र आग्रहाखातर मला मालिकेत एंट्री करावी लागली. आता लवकरच नव्या अंदाजात रसिकांच्या समोर येणार आहे. तोपर्यंत मालिकेवर पूर्वीप्रमाणे प्रेम करत राहा म्हणत चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

खरंतर त्यांची लोकप्रियता पाहाता निर्माते त्यांचे पात्र पुढे नेण्याच्या विचारात होते. त्यासाठी त्यांची समजूतही काढण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र इतर कमिटसमेंटसमुळे त्यांना या मालिकेत आणखीन काही काळासाठी थांबणे शक्य नव्हते. 'साथ निभाना साथिया 2' पूर्वी रुपल पटेल 'ये रिश्ते हैं प्यार के' या मालिकेत काम करत होत्या.

मात्र शोमध्ये व्यस्त असल्यामुळे रुपल यांनी सुरुवातीला या मालिकेत काम करण्यास नकार दिला होता.  मात्र ये रिश्ते हैं प्यार के ही मालिका अर्ध्यावरच बंद पडली, त्यामुळे त्या या मालिकेत काम करण्यास तयार झाल्या. मालिकेच्या दुसर्‍या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. ही मालिका बीएआरसीच्या टीआरपी चार्टवर तिसर्‍या क्रमांकावर आहे.