चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांचं आयुष्य ऐशोआरामाचं असतं. त्यांची जीवनशैली फारच उच्च असते असं आपण पाहतो. मात्र एक कलाकार असा आहे ज्याच्याकडे उपचारासाठीदेखील पैसे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. आशिष यांचे मूत्रपिंड खराब आहे. या कारणास्तव, त्यांच्या शरीरात पाणी जमले आणि पाय सुजले आहेत. कोरोनाव्हायरसच्या भीतीपोटी कोणताही डॉक्टर त्यांना पाहण्यास तयार नव्हता. बरीच विणवणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासले आणि तातडीने रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला.
डायलिसिसच्या तीन तासांसाठी सुमारे 2 हजार रुपये खर्च येतो. आर्थिक अडचणीत सापडलेल्या आशिष यांना आता जगावे की मरावे अशीच परिस्थिती ओढावली आहे. अडचणीमुळे उपचार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पैसे नसल्यामुळे रूग्णालयातून डिस्चार्ज घ्यावा लागला आहे. तसेच इंडस्ट्रीतील कलाकारांनी तरी मदत करावी यासाठी अनेकाकडे मदतीसाठी हातही पसरवले. पण आशिष यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. शेवटी सलमानकडे त्यांनी मदत मागितली होती.पण आतापर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही.
दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द आशिष यांनीच सांगितले की, बिले भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नसल्याने 24 मे रोजी मला हॉस्पिटलमधून सोडण्यात आले. हे बिल 2 लाखांवर पोचले होते, जे मी काही प्रमाणात भरले, पण आता माझ्याकडे पुढील उपचारांसाठी रूग्णालयात दाखल होण्यासाठी पैसे नाहीत. 'ससुराल सिमर का' आणि 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' सारख्या मालिकांमध्ये आशिष रॉयने काम केले आहे. आशिष एक व्हॉईस-ओवर आर्टिस्ट असून त्यांनी ‘सुपरमॅन रिटर्न्स, ‘द डार्क नाइट’, ‘गार्जियन्स ऑफ द गॅलेक्सी’, ‘द लेजेंड ऑफ टार्झन’ आणि ‘जोकर’ या हॉलिवूडपटांसाठी डबिंगही केले आहे.