Join us

या कारणामुळे 'हर मर्द का दर्द' मालिकेतील झिनल बेलानीने वजन केले कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2017 10:13 AM

‘सुमित संभाल लेगा’ या मालिकेनंतर परमित सेठी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे.महिलांकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. महिलांच्या व्यथा, ...

‘सुमित संभाल लेगा’ या मालिकेनंतर परमित सेठी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे.महिलांकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. महिलांच्या व्यथा, त्यांचं दुःख पुरुष ब-याचदा समजून घेण्यात अपयशी ठरतो. स्त्रीचे दुःख  पुरुष स्त्रियांना चांगल्या पद्धतीने ओळखतात हे जरी खरे असले तरी ते त्यांना पूर्णपणे समजतातच असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. स्त्रियांच्या मनातील प्रत्येक गोष्टीचा विविध अंगाने केलेला विचार हा ‘हर मर्द का दर्द’ मालिकेत रसिकांना पाहायला मिळणार आहे.या मालिकेत प्रसिध्द अभिनेत्री झिनल बेलानी ही प्रथमच एक विनोदी भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी तिने आपले तब्बल 15 किलो वजन कमी केले आहे.  Also Read:'ओम शांती ओम' सिनेमातील दीपिका पादुकोणच्या 'रेट्रो' लूकची केली या अभिनेत्रीने कॉपी‘हर मर्द का दर्द’ या मालिकेच्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यापूर्वी झिनल एका गुजराती सिनेमाचे शूटिंग करत होती. त्या भूमिकेसाठी तिला वजन वाढविण्याची गरज होती. पण ‘हर मर्द का दर्द’मधील भूमिकेसाठी तिला वजन घटविण्याची सूचना करण्यात आली. तेव्हा झिनलने जिममध्ये जाऊन नियमित व्यायाम करण्यास आणि आहारावर नियंत्रण आणून संतुलित आहार घेण्यास प्रारंभ केला. या मालिकेत ती नायक फैझल रशीदच्या पत्नीची भूमिका रंगविणार आहे. ती एका नेहमीच्या गृहिणीची भूमिका साकारणार असून ती कसा व काय विचार करते, याच्या विवंचनेत तिचा पती सतत अडकलेला असतो. या जोडप्यातील शाब्दिक बोलाचालीतून विनोदी प्रसंग उभे राहतात. यासंदर्भात झिनाल म्हणाली, “मी जेव्हा सोनूच्या भूमिकेसाठी करार केला, तेव्हा मी खूप आनंदित झाले होते. तिचा पती सतत तिचा विचार करीत असतो आणि ती कोणता विचार करील, याचा विचार करून तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. ही एक मजेशीर भूमिका असून ती प्रेक्षकांना हसवीत राहील.”तिच्या वजन घटविण्याबद्दल विचारले असता झिनलने सांगितले, “मी नुकतंच एका गुजराती चित्रपटाचं चित्रीकरण संपवलं होतं आणि त्या भूमिकेसाठी मी बरंच वजन वाढविलं होतं. पण मी सडपातळ दिसणं ही या मालिकेतील भूमिकेची मागणी होती. त्यासाठी मला वजन घटविणं भागच होतं. तेव्हा मी दिवसातून दोनवेळा व्यायामाला सुरुवात केली आणि माझ्या खाण्या-पिण्याकडेही बारकाईने लक्ष दिलं. भूमिकेसाठी का होईना, पण माझं वजन घटलं, ही चांगलीच गोष्ट झाली म्हणायची.”