Join us

‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील ‘रेवती'ला ओळखले का ? यापूर्वी तुम्ही कधीच पाहिला नसेल तिचा असा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 15:54 IST

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेआधी विविध मालिका आणि सिनेमांमध्ये श्वेतानं अभिनय केला आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड गाजली होती. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले होते. गुरुनाथ, शनाया, राधिका यांच्यातील जुगलबंदी रसिकांना चांगलीच भावली होती. मालिका संपून बरेच दिवस झाले असले तरी,या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात आजही घर करुन आहेत. या मालिकेत राधिकाला तिच्या अडचणीच्या काळात मदत करणारी तिची मैत्रीण म्हणजे रेवती. गुरुनाथ विरोधातील लढाईत राधिकाला रेवतीची खंबीर साथ लाभते. या मालिकेत रेवतीला पुरुष, पुरुषी वृत्तीबद्दल प्रचंड राग दाखवण्यात आला आहे. मालिकेत तिचं लग्न मोडलं असून लेकीचा सांभाळ करते अशी तिची भूमिका होती. गुरु आणि शनायाच्या अफेअरचा सगळ्यात आधी संशय हा रेवतीलाच येतो. रेवतीची मदत घेऊन राधिकाने शनाय आणि गुरुनाथला धडा शिकवते असे दाखवण्यात आले होते. रेवतीची हीच भूमिका अभिनेत्री श्वेता मेहंदळे हिने साकारली होती.

सोशल मीडियावर की सक्रीय असते. व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या सोशल मीडियावर पेजवर नजर टाकल्यास तुम्हाला विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील. पारंपरिक असो किंवा वेस्टर्न तिच्या प्रत्येक अंदाज पाहून तुम्ही तिच्या लूकवर फिदा व्हाल. रिअल लाईफमध्ये तिला ग्लॅमरस राहायला जास्त आवडते असे तिचे फोटो पाहून तुम्हाला जाणवेल. ऑनस्क्रीन सोज्वळ दिसली असली तरी रिअल लाईफमध्ये मात्र ती खूप स्टायलिश आहे. 

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेआधी विविध मालिका आणि सिनेमांमध्ये श्वेतानं अभिनय केला आहे. 'नायक', 'या गोजिरवाण्या घरात', 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला' या मालिकांमध्ये श्वेतानं भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय 'धूम 2 धमाल', 'पाच नार एक बेजार', 'सगळं करुन भागलं', 'असा मी तसा मी', 'जावईबापू जिंदाबाद' अशा सिनेमांमध्येही श्वेताने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.  

टॅग्स :श्वेता मेहंदळे