Join us

रामायणासंबंधी सोप्या प्रश्नाचं उत्तरही देवू शकली नव्हती सोनाक्षी सिन्हा, 'तो' व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 1:56 PM

या शोनंतर सोनाक्षी जबरदस्त ट्रोल झाली होती. नेटीझन्सनेही सोनाक्षीचे ज्ञान पाहून नाराजी व्यक्त केली होती. ज्यांना काहीच माहिती नाही अशांना आपण रोल मॉडल मानतो अशा शब्दांत नेटीझन्सनी संताप व्यक्त केला होता. 

अमिताभ बच्चन यांनी सोनाक्षीला रामायणासंबंधी अत्यंत सोपा प्रश्न विचारला होता. मात्र त्या प्रश्नाचं उत्तरही सोनाक्षीला देता आले नव्हते. नेटिझन्सनेही तिला जबरदस्त ट्रोल केले होते. रामायणात हनुमानाने संजीवनी बुटी कुणासाठी आणली होती? असा प्रश्न अमिताभ बच्चन यांनी सोनाक्षीला विचारला होता. पर्याय पाहूनही सोनाक्षी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकली नाही. त्यावेळी तिने खेळाच्या नियमानुसार लाईफलाईन वापरण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षीने तज्ज्ञांचा सल्ला घेत योग्य उत्तर दिलं. त्यावेळी अमिताभ बच्चनही थोडे आश्चर्यचकित झाले होते. अमिताभ बच्चन यांनी सोनाक्षीला रामायणची आठवण करून दिली. सोनाक्षी ज्या बंगल्यात राहते त्या बंगल्याचे नाव देखील 'रामायण' आहे.

इतकेच नाही तर शत्रुघ्न यांच्या भावांचे नाव देकील रामायणमधीलच आहेत. लक्ष्मण सिन्हा, भरत सिन्हा आणि राम सिन्हा. तर सोनाक्षीच्या भावाचे नाव देखील लव सिन्हा आहे. सोनाक्षीचे रामायणबद्दल  असलेले ज्ञान पाहून शत्रुघ्न देखील हैराण होतील त्यामुळे त्यांना राजकारणातच बिझी राहु द्या असा सल्लाही सोनाक्षीच्या आईला त्यावेळी अमिताभ यांनी दिला होता.  

 

या शोनंतर सोनाक्षी जबरदस्त ट्रोल झाली होती. नेटीझन्सनेही सोनाक्षीचे ज्ञान पाहून नाराजी व्यक्त केली होती. ज्यांना काहीच माहिती नाही अशांना आपण रोल मॉडल मानतो अशा शब्दांत नेटीझन्सनी संताप व्यक्त केला होता. 

सलमान खानने या अटीवर सोनाक्षी सिन्हाला दिले होते सिनेमात काम, तिनेच केला हा खुलासा

सोनाक्षी सिन्हाने 2010मध्ये आलेल्या दबंग सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यावेळी सोनाक्षी सिन्हाचे वजन ऐवढे जास्त होते की कास्टिंग डिरेक्टरपासून ते दिग्दर्शकापर्यंत सिनेमात घेण्यासाठी फारसे कुणी तयार नव्हते. जेव्हा सोनाक्षी तिच्या फिल्मी करिअरला घेऊन चिंतेत होती, तेव्हा सलमान खानने तिला साथ दिली होती. सलमानने तिला बोलावले आणि म्हणाला, “मी तुला माझा चित्रपट घेईन, पण यासाठी तुम्हाला आधी वजन कमी करावे लागेल. सोनाक्षी सांगते की ती त्यावेळी खूप खायची, खाण्यावर बंदी घालणे तिच्यासाठी खूप वेदनादायी होते.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हारामायण