'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतले नट्टू काका उर्फ घनश्याम गुप्ता याच मालिकेमुळे घराघरात प्रसिद्ध झाले होते.जेठालालपासून ते चंपकचाचा, टप्पू सेना भिडे मास्टर सगळेच या मालिकेमुळे लोकप्रिय बनले आहेत. या मालिकेत बागासोबत सतत दिसणारे नट्टू काकाचीही लोकप्रियता कमी नव्हती. सुरुवातीच्या काळात तर केवळ तीन रुपयांसाठी घनश्याम यांनी २४ तास काम केलं. घनश्याम यांचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास मुळीच सोपा नव्हता. परंतु, 'तारक मेहता..' मधील नट्टू काका या पात्राने घनश्याम यांना लोकप्रियता मिळवून दिली.या मालिकेनेच नट्टू काका यांना त्यांच्या आयुष्यात मोठा आधार दिला.
घनश्याम नायक असे त्याचे खरे नाव असले तरी नट्टू काका म्हणूनच त्यांना आज ओळखले जाते.या मालिकेआधी 350 हून अधिक टीव्ही मालिकांमध्ये तर ३१ सिनेमांत काम केले आहे.गेल्यावर्षीपासून त्यांची तब्येत खूपच खालावत गेली होती. कर्करोगाने ते ग्रस्त होते. तब्येत चांगली झाल्यावर नट्टू काका मालिकेत परतील, अशी आशा चाहत्यांना होती. पण ती आशा फोल ठरली. कालांतराने नट्टू काकांची प्रकृती आणखी बिघडत गेली आणि त्यांनी या जगातूनच कायमची एक्झिट घेतली.
तारक मेहता मालिकेत नट्टू काकांच्या आयुष्य खर्यां अर्थाने पालटले. या मालिकेने त्यांना नुसती ओळखच नाही दिली तर पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा सगळे काही मिळवून दिले. तुटपुंज्या मानधनात काम करणारे नट्टू काकाला याच मालिकेने आर्थिक दृष्ट्याही प्रबळ बनवले. मायानगरी मुंबईत त्यांचे स्वतःच्या मालकीचे दोन फ्लॅट आहेत.लॉकडाऊनमध्येही त्यांचे मानधन थांबले नव्हते.
कोरोनामुळे मालिकेत ते झळकत नसले तरी मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी त्यांचे मानधन सुरु ठेवले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका मुलाखतीत शेवटची इच्छा बोलून दाखवली होती.'मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं आहे आणि चेहऱ्यावर मेकअप असताना अखेरचा श्वास घ्यायचा आहे. माझी ही इच्छा देवाने पूर्ण केली पाहिजे', असे त्यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.