Join us

ही गोष्ट करण्यासाठी रेमो डिसुझा आहे उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 5:13 PM

लवकरच रेमो 'डान्स +' च्या पाचव्या सीझनचे परीक्षण करताना दिसणार आहे.

जे यशासाठी कसून मेहनत करतात, त्यांनाच यश प्राप्त होते. ही गोष्ट मनोरंजन उद्योगातील काही नृत्यदिग्दर्शकांनी स्वत:च्या उदाहरणाने सिध्द करून दाखविली आहे.  रेमो डिसुझा, पुनित पाठक आणि धर्मेश येलांडे यांचा समावेश होतो. त्यांनी विविध प्रकारच्या नृत्यशैलींमध्ये विशेष प्रावीण्य मिळविले आहे.

केवळ नृत्यदिग्दर्शन करूनच हे नर्तक थांबले नाहीत; तर त्यांनी नृत्यावर आधारित एबीसीडी आणि एबीसीडी-2 हे दोन चित्रपटही तयार करून आपला वारसा पुढे नेला. ‘डान्स+’ या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमाला ज्याप्रमाणे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला, तशीच या दोन चित्रपटांनीही प्रेक्षकांची आवड ओळखली. आज ‘डान्स+’ या कार्यक्रमाची पाचवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

या कार्यक्रमातील मुख्य परीक्षक रेमो डिसुझा म्हणाला, “मला आठवतं, तेव्हापासून मला केवळ नृत्याचीच आवड होती, असं दिसतं. आता या क्षेत्रात मी जी कामगिरी केली आहे, विशेषत: ‘एबीसीडी’ आणि ‘एबीसीडी-2’ या दोन चित्रपटांच्या माध्यमांतून, त्याचा मला सार्थ आनंद वाटतो आणि ‘डान्स+’ हा कार्यक्रमही गेली चार वर्षं यशस्वीपणे सुरू राहिला आहे.

हा कार्यक्रम जेव्हा सुरू झाला, तेव्हा त्याचं भवितव्य काय असेल, याची आम्हाला कल्पना नव्हती;पण आम्ही आमच्या नृत्यगुणांवर विश्वास ठेवून हा कार्यक्रम धडाक्याने सुरू केला आणि त्याद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात दडून बसलेल्या काही उत्कृष्ट डान्सरना जनतेसमोर आणू शकतो, याचा मला आज आनंद होत आहे. आता ‘डान्स+5’ या आवृत्तीत अधिकच चक्रावून टाकणारे नृत्यप्रकार पाहायला मिळतील कारण ही आवृत्ती पूर्वीपेक्षा भव्य असेल. त्यामुळे आता गुणी नर्तकांचा नृत्याविष्कार पाहण्यास आम्ही खूपच उत्सुक  झालो आहोत.” 

टॅग्स :रेमो डिसुझानृत्य