Join us

डान्स प्लसच्या सेटवर रेमो डिसोजाने स्पर्धकाला दिली ही खास भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 3:50 PM

आपल्या मुलांचे नृत्य पाहताना स्वत:चे नर्तक होण्याचे स्वप्नही पूर्ण होण्याची संधी ओम यांना अनपेक्षितपणे मिळाली. त्यामुळे आता डान्स प्लसमध्ये अभय व आयुष ही मुले त्यांच्या वडीलांसोबत परफॉर्म करताना आपल्याला दिसणार आहेत. 

आपल्या स्वप्नांवर विश्वास असेल, तर एक ना एक दिवस ती प्रत्यक्षात उतरतातच आणि याचा अनुभव सर्वांना ‘डान्स प्लस 4 च्या व्यासपीठावर नुकताच आला. यावेळी ज्यांचे स्वप्न पूर्ण झाले, ते केवळ स्पर्धक नव्हते, तर त्याचे वडीलही होते! 

डान्स प्लस ऑडिशन्सच्या फेरीत ‘ए स्क्वेअर क्र्यू’ (अभय व आयुष) या स्पर्धक जोडीच्या नृत्याने प्रभावित झालेल्या सुपरजज रेमो डिसोजाने त्यांना विचारले की, त्यांना हे नृत्य कोणी शिकविले. तेव्हा त्यांचे उत्तर ऐकून त्याला आश्चर्यच वाटले. या जोडीने सांगितले की, आम्हाला आमच्या वडिलांनी नृत्य शिकविले असून आमच्या जीवनात तेच आमचे ‘प्लस’ आहेत. त्यांचे वडील ओम यांना स्वत:ला नर्तक बनायचे होते; पण आर्थिक अडचणींमुळे ओम यांना आपले स्वप्न पूर्ण करता आले नाही. मात्र त्यांनी आपल्या मुलांमार्फत हे स्वप्न जिवंत ठेवले. या जोडीला आपल्या वडिलांबरोबर नृत्य करताना पाहून प्रभावित झालेल्या रेमोने त्या तिघांची निवड मेगा फेरीसाठी स्पर्धक म्हणून केली. पण त्याचसोबत कोणत्याही रिअॅलिटी शो मध्ये न घडलेली एक गोष्ट देखील या कार्यक्रमात घडली. या जोडीबरोबर त्यांच्या वडिलांनाही एक स्पर्धक म्हणून घोषित करण्याचा रेमोने निर्णय घेतला.   रेमोच्या या उत्स्फूर्त निर्णयामुळे ओम हे काही काळ अवाकच झाले. कारण आपले नर्तक होण्याचे स्वप्न अशा प्रकारे पूर्ण होईल, याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. त्यांच्या मुलांप्रमाणे आता त्यांचे देखील एक चांगला नर्तक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ‘डान्स प्लस 4’चा सुपरजज रेमोने ओमला सांगितले, “तुमच्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे तुमचं नर्तक बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. आता मी तुमचं हे स्वप्न पूर्ण करतो. आतापासून या स्पर्धेत तुम्ही तिघेजण एकत्र गट म्हणून सहभागी होणार आहात.”

आपल्या मुलांचे नृत्य पाहताना स्वत:चे नर्तक होण्याचे स्वप्नही पूर्ण होण्याची संधी ओम यांना अनपेक्षितपणे मिळाली. त्यामुळे आता डान्स प्लसमध्ये अभय व आयुष ही मुले त्यांच्या वडीलांसोबत परफॉर्म करताना आपल्याला दिसणार आहेत. 

टॅग्स :डान्स प्लस 4रेमो डिसुझा