छोट्या पडद्यावरच्या मालिकांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. पण अनेकदा मालिका ट्रोलही होतात. अनेकदा मालिकेतील बदल, मालिकेतील अनपेक्षित वळणं प्रेक्षकांना आवडत नाहीत आणि मग मालिका ट्रोल होतात. सध्या अशीच एक मालिका ट्रोल होतेय. रंग माझा वेगळा मालिकेवर प्रेक्षक संतापले आहेत.
दीपाची मैत्रीण साक्षी हॉस्पिटलमध्ये जीव जातो. दीपाला साक्षनं तिच्या पडत्या काळात साथ दिलेली असते. दीपाची मैत्रीण साक्षीच्या ऑपरेशन दरम्यान कार्तिकने मुद्दाम तिचा जीव घेतला असा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून, यामुळेच त्याला पोलिसांनी अटक केली होती. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिस करत असून कोर्टात केस सुरु आहे.आता दीपामुळेच कार्तिकच्या अडचणीत वाढ होणार आहे. मालिकेच्या पुढच्या भागाचे अपडेट नुकतेच समोर आले आहेत.
नुकताच मालिकेच्या एक प्रोमो समोर आला आहे. यात दीपा कार्तिक विरुद्ध साक्ष देताना दिसतेय. दीपाच्या साक्षीवरुन कार्तिकला कोर्ट खूनचा आरोपी ठरवतो. मालिकेत पुढे कोर्ट त्याला चौदा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावणार आहे. कार्तिकला पोलिस कोर्टातून बाहेर घेऊन जात असताना दीपा त्याची माफी मागते. मालिकेत आलेल्या या नव्या ट्विस्टमुळे कथानक बदललं असून मालिका रंजक वळणावर आली आहे. मालिका आता लीप घेणार आहे.
मालिकेचं कथानक तब्बल चौदा वर्षांनी पुढे सरकणार आहे. त्यामुळे येत्या काळात मालिकेत नवीन काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण मालिकेत आलेल्या या नवा वळणामुळे प्रेक्षक भडकले आहेत. त्यांनी मालिकेला ट्रोल करायाला सुरुवात केली आहे.
मालिकेला ट्रोल करत एका यूजरने लिहिले, ''राम आणि सीता चौदा वर्षे वनवासाला सोबत गेले होते... त्यामुळे दिपाने सौंदर्याचा खून करून चौदा वर्षे कार्तिक सोबत जेलमध्ये जावं....'',आणखी एका युझरनं म्हटलंय, यांचे लग्न झाले तेव्हा वाटले होते कि सर्व चांगलं दाखवतील पण यांची फालतूपणा करायची सवय गेली नाही..प्रेक्षकांनाच पाठवा आता अज्ञातवासात आणि तुम्हीच बघा तुमची नाटकं ..कधीतरी happy ending दाखवा ..,'फालतूपणा चालू आहे नुसता..' 'हा मूर्खपणा आहे..', 'आम्ही आधी खूप बघायचो हि मालिका पण आता बघणार नाही...'