या कारणामुळे आजही रूपाली भोसलेची आई करते शिवणकाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 06:46 PM2019-07-09T18:46:22+5:302019-07-09T18:50:14+5:30
रुपाली बिग बॉस मराठीच्या घरात तिच्या आईविषयी बोलताना दिसत आहे.
'बिग बॉस मराठी २' या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून या घरातील सगळेच स्पर्धक आता प्रेक्षकांचे प्रचंड आवडते बनले आहेत. सध्या घरात असलेल्या स्पर्धकांपैकी कोण स्पर्धक विजेता ठरणार याचा प्रत्येकजण अंदाज लावत आहे.
असे म्हणतात की, आपल्या रक्त्याच्या नात्यांना कधीच विसरू नये. अतिशय सामान्य कुटुंबात लहानाची मोठी झालेली रूपाली भोसले निश्चितच 'अनसीन अनदेखा'च्या नवीन क्लिपमध्ये आपल्याला काही प्रेरणा देताना दिसत आहे. अभिनेता अभिजीत केळकरसोबत गप्पा करताना रूपाली तिच्या कुटुंबाबाबत प्रचंड भावूक झालेली आहे.
रूपाली गार्डनमध्ये फेरफटका मारताना तिच्या कुटुंबियांविषयी अभिजीतला सांगत आहे. ती सांगते, तिची आई स्वावलंबी असून आजही या वयात शिलाई मशिनवर काम करते. खरे तर तिला आज काम करण्याची गरज नाहीये. पण तरीही जे तुला आवडतं ते कर असे मी तिला सांगते. मी केवळ दहा वर्षांची असताना माझ्या वडिलांचे निधन झाले आणि तेव्हापासून तिने कपडे शिवायला सुरुवात केली. मी म्हणते लाजू नको, काम कर! तिला असं वाटतं की मी मनोरंजनच्या फिल्डमध्ये आहे तर लोक म्हणतील की, रूपालीची आई शिवणकाम करते. तर मी तिला म्हणाले की 'काही गरज नाही, मी म्हणतेय ना, तर कर!''
रूपालीचा भाऊ संकेतच्या पायात रॉड बसवलेला आहे. त्याची आठवण काढत ती सांगते. मी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येण्यापूर्वी संकेतला एक गोष्ट आवर्जून सांगितली होती. मी तिला सांगितले होते की, ''खूप पाऊस असेल, सगळे काही बंद झाले असेल तर प्लीज घरी थांब... जास्त दगदग करू नकोस... कारण तुझा पाय स्ट्रॉंग नाहीये. त्यामुळे असा धकाधकीचा प्रवास तुला जमणार नाही.''
अभिजीत या गोष्टीबाबत भावूक होऊन संकेतच्या स्थितीबाबत रूपालीला विचारतो. त्याविषयी रुपाली सांगते, त्याच्या पायामध्ये एक रॉड बसवण्यात आला आहे. तो प्रचंड मेहनती असून एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला आहे.''