देशातील सर्वात मोठा कुकिंग रिअॅलिटी शो मास्टर शेफ इंडिया सोनी टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिववर पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मास्टर शेफचा यंदाचा हा दुसरा सीझन असेल. मास्टरशेफ इंडिया हा सर्वात प्रतिष्ठित कूकिंग रिअॅलिटी शो आगामी सीझनमध्ये सहभाग घेण्यासाठी उत्तम कूकिंग कौशल्य असलेल्या प्रतिभावान व्यक्तींचा शोध घेत आहे. विकास खन्ना आणि रणवीर ब्रार यंदाच्या सीझनमध्येही परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
तुमच्यामध्ये सर्जनशीलता, टेक्निक आणि प्रेझेन्टेशनसह आमच्या तज्ञ परीक्षकांच्या पॅनेलला प्रभावित करण्याची क्षमता असेल तर ही स्पर्धा तुमच्यासाठीच आहे. तुम्ही होम कूक असा किंवा किचनमध्ये प्रयोग करण्याची आवड असणारी व्यक्ती असाल, मास्टरशेफ इंडिया तुमच्या फूडप्रती आवडीसह स्वागत करत आहे. तर मग, काहीतरी असाधारण अनुभव घेण्यास आणि पाककला विश्वामध्ये स्वत:ची छाप पाडण्यास सज्ज राहा! नोंदणीकरिता सोनी लिव्ह अॅपला भेट द्या आणि अर्ज भरा. या अविश्वसनीय प्रवासाचा भाग बनण्याची संधी गमावू नका, जेथे तुम्हाला प्रतिष्ठित शेफ्सकडून शिकण्याची, बहुमूल्य मार्गदर्शन मिळण्याची आणि लाखो प्रेक्षकांना कूकिंगप्रती तुमची आवड दाखवण्याची संधी मिळणार आहे. फक्त एवढेच नाही, इन्स्टाग्रामवरील नवीन मास्टरशेफ इंडिया फिल्टरचा वापर करत तुम्ही आता शोमध्ये तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्यांना नॉमिनेट करू शकतात, जे तुमच्या मते शोमध्ये स्पर्धा करण्यासाठी क्षमतापूर्ण आहेत. त्यांना व सोनी लिव्हला टॅग करत फोटो पोस्ट करा.
सूत्रांच्या माहितीनुसार, गरिमा अरोरा आगामी मास्टर शेफ इंडियाचा भाग होणार नाही. पण शेफ विकास खन्ना आणि रणवीर ब्रार या शोचा भाग असणार आहेत. गरिमा अरोरा यांनी गेल्या वर्षी मास्टर शेफ इंडियाच्या पहिल्या सीझनमध्ये प्रथम जज म्हणून काम केले होते. मात्र प्रेग्नेंसीमुळे गरिमा अरोराने हा शो करण्यास नकार दिला आहे. गरिमा अरोरा दुसऱ्यांदा आई होणार आहे.