'बिग बॉस सीझन 14' ला दणक्यात सुरुवात झाली आहे. मात्र यंदाचे पर्व हवे तितके रंजक नसल्यामुळे टीआरपीच्या शर्यतीत बिग बॉस मागेच आहे. हा शो जास्तीत जास्त इंटरेस्टींग कसा बनवला जाईल यावर आता निर्माते जास्तच लक्ष देत आहेत. त्यामुळे एक वेगळाच फंडा वापरण्याच्या तयारीत शोची टीम आहे. सुशांतच्या निधनामुळे प्रकाशझोतात आलेली रिया चक्रवर्तीची पब्लिसिटी इनकॅश करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असल्याची माहिती समोर येत आहे.
सुशांत सिंगची गर्लफ्रेंड आणि ड्रग्स प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्तीला शोमध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा करण्यात आली आहे. रियाने अद्याप याविषयी कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. वास्तविक, यावेळी शोची टीआरपी कमी होत आहे. शोच्या लोकप्रियतेनुसार, हवी तशी शोची चर्चा होत नाहीय. म्हणून शोला तडका देण्यासाठी रियाने शोमध्ये सहभागी व्हावे असे निर्मात्यांची इच्छा आहे.
दुसरीकडे,कॅमेरासमोर असल्याने सुशांत प्रकरणाबाबत बर्याच गोष्टी स्पष्ट होतील. असेही म्हटले जात आहे. तर सध्या रियाची आर्थिक परिस्थिती ठीक नाही. शोमध्ये सहभागी झाल्यास तिची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासही मदत होईल आणि शोलाही चांगला टीआरपी मिळेल. म्हणून रियाला शोमध्ये सहभागी करून घेण्याची शोची टीम धडपड करत आहे.
SSR Case : रियाने शेजारणीविरोधात पत्र लिहून केली सीबीआयला तक्रार
रिया जामिनावर जेलबाहेर आली आहे. आता अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने तिची शेजारी डिंपल थवाणी हिच्याविरूद्ध सीबीआयकडे लेखी तक्रार केली आहे. रिया हिने डिंपलविरोधात कारवाई करण्याची मागणी सीबीआयला केली आहे. रिया म्हणाली आहे की, तिच्यावर खोटे आणि बनावट आरोप लावण्यात आले होते. या तक्रारीत रिपब्लिक टीव्हीचेही नाव आहे, याबाबत माहिती रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे.
रियाच्या शेजारी असलेल्या डिंपलने असा दावा केला होता की, 13 जूनच्या रात्री सुशांत सिंग राजपूत रिया सोडण्यासाठी तिच्या इमारतीत आला होता. 14 जून रोजी सुशांत सिंग राजपूत मुंबईच्या वांद्रे येथे एका घरात मृतावस्थेत आढळला. सुशांत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करीत आहे. सीबीआय चौकशीत डिंपल हे आरोप सिद्ध करू शकले नाहीत असा अनेक माध्यमांच्या वृत्तांत दावा केला गेला आहे.