Join us

शुबमन गिलच्या प्रेमात रिद्धीमा पंडित? रिलेशनशीपवर अभिनेत्रीनं सोडलं मौन, म्हणाली - "मी त्याला डेट..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 10:49 AM

गेल्या काही दिवसांपासून ती क्रिकेटर शुबमन गिल(Shubhman Gill)ला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. या चर्चेवर आता रिद्धीमाने मौन सोडले आहे.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री रिद्धीमा पंडित(Ridhima Pandit)ने बऱ्याच लोकप्रिय मालिकेत काम करून आपली छाप उमटविली आहे. तिला 'बहू हमारी रजनीकांत' या मालिकेतून खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. तिने या मालिकेत रोबोट रजनीची भूमिका केली होती. त्यानंतरही ती अनेक मालिकेत पाहायला मिळाली. रिद्धीमा प्रोफेशनल लाइफशिवाय खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ती क्रिकेटर शुबमन गिल(Shubhman Gill)ला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. या चर्चेवर आता रिद्धीमाने मौन सोडले आहे.

मागील महिन्यात अचानक सोशल मीडियावर अचानक रिद्धीमा पंडित क्रिकेटर शुबमन गिलसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र अभिनेत्रीने या चर्चेत तथ्य नसल्याचे सांगितले. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने शुबमनसोबतच्या नात्यावर मौन सोडले आहे. तिला एका मुलाखतीत शुबमनला डेट करते आहेस का, असे विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली की, नाही. मी त्याला ओळखतदेखील नाही. मात्र एकदा तरी त्याला भेटायचे आहे. जर मी त्याला डेट करत असते तर वेगळी बाब असती. मी शुबमनला ओळखत नाही. मात्र तो एक चांगला खेळाडू आहे, यापेक्षा जास्त मी त्याला ओळखत नाही.

शुभमन खूप क्युट आहेरिद्धीमा पुढे म्हणाली की, जर मी कधी त्याला भेटेन तेव्हा आम्ही दोघे मिळून यावर खूप हसणार आहोत. तो खूप क्युट आहे. मात्र आमच्या दोघांमध्ये काहीच नाही आणि होणारदेखील नाही. मात्र एक दिवस त्याला नक्कीच भेटेन.

रिद्धीमा या अभिनेत्याला करत होती डेट

शुबमनच्या आधी रिद्धीमाचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले आहे. तसेच तिने अभिनेता हृतिक रोशनचा चुलत भाऊ एहसान रोशनला १० वर्षे डेट केले होते. मात्र आता त्यांचं ब्रेकअप झाले आहे. 

टॅग्स :शुभमन गिल