Uorfi Javed Fake Death News: कपड्यांच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सध्या जाम वैतागली आहे. कारणही तसंच आहे. होय, बोल्ड अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या उर्फीबद्दल अशी काही अफवा पसरली की खुद्द ती सुद्धा सुन्न झाली. ‘या जगात हे काय सुरू आहे?’ असा सवाल तिनं केला.
अलीकडे उर्फीला जीवे मारणाच्या धमक्या मिळत आहेत. तिने उदयपूरमधील कन्हैयालाल हत्याकांडाची कठोर शब्दांत निंदा केली होती. यानंतर तिला जीवे मारण्याच्या धमकीचे मॅसेज येत आहेत. पण आता तर हद्दच झाली. होय, आत्तापर्यंत उर्फीला केवळ धमक्या मिळत होत्या. पण आता तिने आत्महत्या केल्याची खोट्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. तिने गळफास घेतल्याचे फोटो शेअर करून तिच्या आत्म्याला शांती मिळो, अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत.
उर्फी म्हणाली,आपल्या आत्महत्येच्या अफवा पाहून उर्फी जावेदने काहीशी संतप्त प्रतिक्रिया दिली. इन्स्टास्टोरीवर तिने एक स्क्रिनशॉट शेअर केला. यात दोन फोटोंचा कोलाज आहे. एका फोटोत तिच्या गळ्यात गळफास दिसतोय तर दुसरा नॉर्मल फोटो आहे. कैलाश राज नावाच्या युजरने फेसबुकवर ही पोस्ट शेअर करत, ‘RIP उर्फी जावेद, कुणासाठीही ही फार मोठं नुकसान नाही...,’ असं सोबत लिहिलेलं आहे. इतकंच नाही तर तिच्या जन्माचं आणि मृत्यूचं साल सुद्धा यावर नमूद आहे. ही इन्स्टास्टोरी शेअर करत उर्फीने संताप व्यक्त केला. ‘या जगात हे काय सुरू आहे? मला जीवे मारण्याच्या अनेक धमक्या मिळत आहेत आणि आता हे...,’असं तिने म्हटलं आहे.
आम्ही सांगू इच्छितो की, उर्फी जावेदच्या आत्महत्येची बातमी अफवा आहे. कुणीतरी तिचे फोटो मॉर्फ केले आहेत. उर्फीने काही दिवसांआधी कुलूप व साखळ्यांचा नेकपीस घालून मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसली होती. यामुळे तिच्या मानेवर लाल खुणा झाल्या होत्या. त्याचा फोटो खुद्द उर्फीने शेअर केला होता. तिचा हाच फोटो फोटोशॉप्ड करून तिच्या गळ्यात गळफास बांधला गेला आणि हाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर उर्फीने आत्महत्या केल्याची अफवा पसरली.
उर्फी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्फीचा सोशल मीडीयावरही खूप मोठा चाहतावर्ग आहे. नेहमी वादग्रस्त विधाने करून, कपड्यांच्या वेगवेगळ्या फॅशन्स करून ती स्वत:कडे लक्ष वेधून घेते.