टीव्हीची 'चंद्रमुखी चौटाला' अर्थात अभिनेत्री कविता कौशिक तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सामाजिक ते राजकीय या प्रत्येक विषयावर तिचे परखड मत ती मांडत असते. नुकतेच, कविता कौशिकने 'फाटलेल्या जीन्स घालून महिला मुलांना काय संस्कार देणार? यामुळं समाजात काय संदेश जाईल?' असं म्हणत उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीर्थ सिंह रावत यांनी केलेल्या विधानावर कडक टीका केली आहे.
उघड्यावर आंघोळ करणार्या पुरुषांवर कोणी काही बोलत नाही. असे सांगत कविता कौशिकने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत पुरुष उघड्यावर अंघोळ करताना दिसत आहेत.
फोटो शेअर करत कविता कौशिकने लिहिले - 'प्रिय पुरुषांनो, आम्ही तुम्हाला उघड्यावर आंघोळ करतात. यावर कोणाचे लक्षही जात नाही.या गोष्टीचा लोकांना त्रासही होत नाही. त्यामुळे आम्हालाही आमची फाटलेली जीन्स घालू द्या आणि इतकंच काय तर आमची ब्राची स्ट्रिपही दिसू द्या फोटो जनहितार्थ जारी म्हणत तिने सटकून यावर टीका करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. सध्या कविताचे ट्विट व्हायरल झाले आहे. चाहते देखील कविताच्या विचारांचे कौतुक करत आहेत.
कविता कौशिकला तिची खरी ओळख 'एफआयआर' मधून मिळाली. या शोमध्ये तिने चंद्रमुखी चौटालाची भूमिका साकारली होती. याशिवाय कविता बर्याच पंजाबी चित्रपटांमध्येही दिसली आहे. ती अखेर 'बिग बॉस 14' मध्ये दिसली होती.