Join us

फक्त महिलांचं 'बिग बॉस' सुरु केलं तर? रितेश देशमुखने दिलं मजेशीर उत्तर; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 1:08 PM

केदार शिंदे म्हणाले, 'मला आवडेल सगळ्या बायकांना आत टाकायला पण...'

बिग बॉस मराठीचा पाचवा (Bigg Boss Marathi 5) पर्व लवकरच सुरु होतोय. हा सीझन मराठमोळा लयभारी अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)शो होस्ट करणार आहे. 'कल्ला तर होणारच' म्हणत त्याचा प्रोमोही समोर आला. रितेशला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान काल बिग बॉस मराठी 5 ची प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. यावेळी फक्त स्त्रिया या स्पर्धक असलेलं बिग बॉस सुरु केलं तर? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर रितेश देशमुखने मजेशीर उत्तर दिलं.

बिग बॉस शोमध्ये स्पर्धक १०० दिवस घरात राहतात. त्यांना वेगवेगळे टास्क दिले जातात. स्पर्धकांमध्ये बरीच भांडणंही होतात. काल झालेल्या पत्रकार परिषदेत एक प्रश्न विचारण्यात आला. 'फक्त महिला स्पर्धक घेऊन बिग बॉस सुरु केलं तर?' यावर रितेश देशमुखने असं उत्तर दिलं की सर्वांनाच हसू फुटलं. रितेश या प्रश्नावर प्रतिप्रश्न करत म्हणाला, 'फक्त स्त्रिया स्पर्धक? मग १०० दिवस शो चालेल का?' 

कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड दिग्दर्शक केदार शिंदेंनाही हाच प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, "२००४ साली अगं बाई अरेच्चा आला. २०२३ साली बाईपण भारी देवा केला. २०२४ साली पहिल्यांदा बिग बॉस करतोय. आता थोडे दिवस थांबूया. मला जरा अनुभव घेऊ दे. मला आवडेल सगळ्या बायकांना आतमध्ये टाकायला. मलाच त्याचंही दिग्दर्शन करावं लागले. पण सध्या याच बिग बॉसबद्दल बोलूया."

टॅग्स :रितेश देशमुखबिग बॉसकेदार शिंदेमराठी अभिनेताकलर्स मराठी