Join us

रितेश 'बिग बॉस मराठी'चा नवा होस्ट, पत्नी जिनिलीयाची 'लय भारी' प्रतिक्रिया! म्हणाली -

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 17:23 IST

रितेश देशमुख बिग बॉस मराठी 5 चा नवीन होस्ट म्हणून समोर येतोय. त्यानिमित्त रितेशची पत्नी जिनिलीयाने खास प्रतिक्रिया दिली आहे (riteish deshmukh, genelia deshmukh)

आज मराठी मनोरंजन विश्वात मोठी घोषणा झाली. ती म्हणजे... 'बिग बॉस मराठी 5' अर्थात बिग बॉसचा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे मागच्या चार सीझनचे होस्ट महेश मांजरेकर या नव्या सीझनचं सूत्रसंचालन करणार नाहीत. त्यांच्या जागी अभिनेता रितेश देशमुख  'बिग बॉस मराठी 5' चं होस्टींग करणार आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसलाय. यावर रितेशची बायको अर्थात महाराष्ट्राची लाडकी वहिनी जिनिलीयाने खास पोस्ट केली आहे.

जिनिलीया सोशल मीडियावर कायमच रितेश देशमुखचं कौतुक करत असते. याशिवाय त्याच्या नवीन प्रोजेक्टविषयी चाहत्यांना अपडेट करत असते. अशातच जिनिलीयाने रितेशचा  'बिग बॉस मराठी 5' चा प्रोमो शेअर केलाय. हा प्रोमो शेअर करुन जिनिलीयाने 'आता वाट बघू शकत नाही', असं म्हटलंय. अशाप्रकारे  'बिग बॉस मराठी 5' मध्ये रितेश देशमुखला होस्ट करताना बघण्यासाठी जिनिलीया उत्सुक आहे असं म्हणता येईल.

 

बिग बॉस मराठी 5 चं सूत्रसंचालन बॅालीवूडचा स्टार, प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता , अवघ्या महाराष्ट्राचाच नाहीतर जगभरातील मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत असलेला “लय भारी” स्टार रितेश देशमुख करणार आहे. कलर्स मराठी आणि JioCinema च्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवर “बिग बॉस मराठी” चा व्हिडिओ शेयर केला आला असून त्यामध्ये बिग बॉसचा डोळा त्याच सोबत बॅालीवूडचा स्टायलिश हिरो आणि रसिकांना ‘वेड’ लावणारा मराठमोळा मुलगा रितेश देशमुख देखील दिसत आहे. या नव्या सिझनचे हे नवे सरप्राईज असणार असून या सिझनमध्ये  रितेश देशमुखबरोबरच एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 

टॅग्स :बिग बॉसबिग बॉस मराठीरितेश देशमुखजेनेलिया डिसूजा