Join us

“सुखी संसाराचे रहस्य काय?”, लग्नाच्या १० वर्षानंतर रितेश देशमुखने केला खुलासा, म्हणाला- माणसाने...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 12:17 PM

लग्नाला १० वर्षे उलटल्यानंतर रितेश देशमुखने त्याच्या सुखी संसाराचे गुपित सगळ्यांना सांगितले आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक कपल म्हणजे रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया डिसूझा-देशमुख (Genelia Dsouza-Deshmukh). या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. हे दोघे नुकतेच वेड चित्रपट पाहायला मिळाले. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली आहे. नुकतंच रितेश देशमुखने त्याच्या सुखी संसाराचे गुपित सांगितले आहे.

रितेश पत्नी जिनिलियासोबत झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाला होता. यादरम्यानचे दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापैकी त्यांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडीओत अभिनेता श्रेयस तळपदे रितेशला त्याच्या संसारबाबत प्रश्न विचारताना दिसत आहे. 

श्रेयसने रितेशला विचारलं “सुखी संसाराचे रहस्य काय?”, यावर तो म्हणाला, माणसाने चूक आपलीच आहे हे लवकर कबूल केलं पाहिजे”, असे रितेश मजेत म्हणतो. त्यानंतर श्रेयस हा ‘रितेश देशमुख हे त्यांच्या पत्नीला घाबरतात’, असे ओरडताना दिसतो. त्यांचा हा व्हिडीओ झी मराठीने शेअर केला आहे. यात श्रेयस आणि रितेशची ऑनस्क्रीन सुरु असलेली मजामस्तीही पाहायला मिळत आहे.

रितेश आणि जिनिलियाची प्रेमकहाणी कोणत्याही पटकथेपेक्षा कमी नाही. २००३ मध्ये 'तुझे मेरी कसम' चित्रपटाच्या सेटवर दोघेही पहिल्यांदा भेटले होते. रितेशचा हा डेब्यू चित्रपट होता, तर जिनिलिया आधीच दाक्षिणात्य सिनेमांमध्ये नावाजलेली अभिनेत्री होती. जिनिलिया रितेशला पहिल्यांदा भेटली तेव्हा तो मुख्यमंत्र्यांचा वाया गेलेल्या मुलासारखा असावा, असं तिला वाटलं होतं. पण हळूहळू ती रितेशमध्ये गुंतत गेली. रितेश आणि जिनिलिया यांनी १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं.  २०१२ मध्ये दोघांचं लग्न झालं. दोघांना रायल आणि रियान ही दोन मुलं आहेत.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजाझी मराठी